जामखेड न्युज——
अनेक दिवसांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे जाहीर आभार!!!
जामखेडमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स
अनेक दिवसांपासून रखडलेल्या जामखेड नळपाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण योजनेच्या मंजूरीचा जीआर काढून अंतीम स्वरुप दिल्याने मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार प्रा. राम शिंदे यांचे जामखेड शहरवासीयांच्या वतीने जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक व पाणी पुरवठा सभापती अमित चिंतामणी व शहरातील भाजपा पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत.
जामखेड करांना बहुचर्चित व आवश्यक अशा या योजनेचची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती या कामाचे १७९. ९८ लक्ष रुपये किंमतीचे मंजुरीचे पत्र मिळाल्याने आता लवकरच जामखेड शहर व नगर परिषद हद्दीतील वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. यामुळे जामखेड शहरातील जनतेतून या निर्णयाचे मोठे स्वागत होत आहे.
मुंबई येथे गुरूवारी दि.१डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हे पत्र देण्यात आले. यावेळी जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक बिभीषण (मामा)धनवडे, नगरसेवक गणेश आजबे, नगरसेवक शाकीर खान, नगरसेवक संदीप गायकवाड, विधी व न्याय जि.अध्यक्ष अँड. प्रवीण सानप, जि.प.सदस्य सोमनाथ पाचारने, डाॅ अलताब शेख, प्रा. आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट आदिंसह जामखेड भाजपा पदाधिकारी व नेते उपस्थित होते.