जामखेड न्युज—–
वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व टूथब्रशची आरोग्यदायी अनोखी भेट
भुतवडा शाळेतील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व ४९ मित्रांना टूथपेस्ट व टूथब्रशची अनोखी भेट वाटून देऊन दिला अरोग्यपूर्ण संदेश
भुतवडा शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रवीण डोके यांचा चिरंजीव यश डोके इ.३ री याचा वाढदिवस शाळेत विशेष पद्धतीने साजरा.
मागील काही दिवसापासून ‘वाढदिवस आपल्या मित्राचा’ या उपक्रम अंतर्गत मुलांचे वाढदिवस शाळेतच साजरा करणे, केक ऐवजी फळे कापून अरोग्यपूर्ण आहाराची सवय लावणे, वृक्षारोपण करणे आदी. कार्यक्रम घेतले जात होते; शिवाय वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने आपल्या शाळेतील सर्व मित्रांना वही,पेन,पट्टी अशी कोणत्याही अभ्यासपूरक वस्तूचे वाटप करत आपला आनंद द्विगुणित करण्याची परंपरा निर्माण करण्यात आली आहे.
शाळेतील आजचा वाढदिवस मात्र काहीसा विशेष ठरला. आज जागतिक दिव्यांग दिन आणि यशचा वाढदिवस एकाच वेळी आल्याने संयुक्त साजरा करण्यात आला; शिवाय त्यांनी आपल्या सर्व ४९ मित्रांना टूथपेस्ट व टूथब्रश चे वाटप करुन आरोग्यमय चांगल्या सवयींचा एकप्रकारे प्रचार केला. अशी अनोखी व उपयुक्त भेटवस्तू प्राप्त झाल्याने मुलांना आनंद तर झाला.सोबत चांगल्या सवयी लावून घेण्याचा संकल्प केला..