जामखेड न्युज——
खर्डा (दरडवाडी) येथील विनोद दराडेचा प्रवास प्रेरणादायी
विनोद दराडेच्या निवडीबद्दल जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा – आमदार रोहित पवार
इंडीयन आर्मीच्या अग्निवीर भरती परीक्षेत व स्पर्धेत यश मिळवलेल्या खर्डा येथील विनोद दराडे याने पॅरा कमांडो मध्ये निवड झालेल्या पाच क्रमांक मध्ये निवड झाली, सर्व अग्नविर एकूण 70 हजार परीक्षार्थितून फक्त 40 अग्निविरांची निवड झाली त्यातही दराडे यांनी यश संपादन केले फक्त पॅरा कमांडो 5 जागा भरायच्या होत्या त्यातील भरती मध्ये पहिला क्रमांक पटकावला व अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्याची मान उंचावली त्यामुळे खर्डा ग्रामक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.
पॅरा कमांडो ही भारतीय सैन दलाची विशेष लष्करी तुकडी आहे (special_Forces)जे दहशतवाद, सर्जिकल स्क्ट्राइक, स्पेशल ऑपरेशन, व युद्धदरम्यान काम करतात….
आज खर्डा येथे छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात कॉलेजचा विद्यार्थी गौरव म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, डॉ. महेश गोलेकर, मा.पंचायत समिती सदस्य श्री विजयसिंह गोलेकर ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे, खर्डा ग्रामपंचायत सरपंच आसाराम गोपाळघरे, सत्कार मूर्ती विनोद संतोष दराडे व तरिकलाल बोलकं तात्या दराडे व सर्व शिक्षक वृंद, पत्रकार व खर्डा ग्रामकृषितील नागरिक उपस्थित होते