जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
शहरात व हाॅस्पिटल बाहेर मोफत मोफत मोफत चे मोठ मोठे फलक लावून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सिझर व गर्भाशयाची पिशवीची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल असे सांगितले जाते मात्र हाॅस्पिटल मध्ये दाखल होताच वेगवेगळ्या नावाखाली प्रोसेसिंग फी व इतर कारणे सांगून पेशंटला भीती दाखवून पंचवीस ते तीस हजार रुपये प्रत्येक पेशंट कडून वसुल केले जातात तसेच शासनाकडूनही पैसे हडप केले जातात अशी दुहेरी लूट करणाऱ्या इंदिरा हाॅस्पिटल वर योग्य ती कारवाई करावी व ज्या रूग्णांची फसवणूक झाली आहे त्यांचे पैसे ताबडतोब परत करावेत अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व फसवणूक झालेल्या रूग्णांनी दिला आहे.

गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली व शहरातील काही हाॅस्पिटल मध्ये या योजनेचा समावेश केला या योजनेखाली गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळतात पण जामखेड शहरातील इंदिरा हाॅस्पिटल मध्ये या योजनेत बसणारे लाभार्थी यांच्या कडूनही हजारो रूपयांचे बील घेतात त्यामुळे शासनाचाही निधी हडप करतात व लाभार्थी धारकांकडूनही पैसे घेतात. इंदिरा हाॅस्पिटलने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसणारे लाभार्थी ज्यांची फसवणूक झाली आहे.यांचे पैसे ताबडतोब परत करावेत व हाॅस्पिटलची मान्यता रद्द करावी
अशी मागणी योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे. फसवणूक झालेल्यांचे पैसे परत न मिळाल्यास
उपोषणाला बसण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत शस्त्रक्रिया होत आसतानाही पेशंट व नातेवाईकांकडून तीस हजार रुपये इंदिरा हाॅस्पिटलने घेतलेले आहेत तसेच त्यांच्या नावावर शासनाकडूनही शस्त्रक्रियेचा निधी मिळवला आहे तेव्हा दुहेरी लूट करणाऱ्या या हाॅस्पिटल वर योग्य कारवाई करावी व लूट झालेल्या पेशंटचे पैसे परत करावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. एक तक्रार दाखल झाल्यानंतर अनेकांनी सांगितले की आमचेही तीस हजार रुपये घेतलेले आहेत. आतापर्यंत पाच लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत तर अनेकांनी तोंडी तक्रारी केल्या आहेत. याबाबत हाॅस्पिटल व व डॉक्टर यांना कुणकुण लागताच अनेकांना फोन करून पैसे परत दिले आहेत.
आतापर्यंत संभाजी आजीनाथ डोके रा. भुतवडा, संदेश भाऊसाहेब गोरे रा. आपटी, श्रीकांत हनुमंत परकड रा. लोणी, हरिदास किसन पोकळे रा. जांबवाडी, अंगद दिलीप पवार रा. पाडळी यांनी जिल्हा समन्वयक महात्मा फुले जनआरोग्य योजना यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
त्यामुळे इंदिरा हाॅस्पिटलच्या गैरकारभाराची कृत्य लवकरच बाहेर येतील
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे म्हणाले की, गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे परंतु जामखेड शहरातील इंदिरा हाॅस्पिटल मध्ये या योजनेखाली उपचार करणार्या पेशन्ट कडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात तेव्हा गोरगरीब जनतेला न्याय मिळाला आतापर्यंत शासनाकडून व पेशन्ट कडूनही दुहेरी लाभ घेणाऱ्या हाॅस्पिटल कडून सर्व वसुली करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.