Home ताज्या बातम्या शिक्षकच आपली दुसरी आई – जयवंतराव आवटे जामखेड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक...

शिक्षकच आपली दुसरी आई – जयवंतराव आवटे जामखेड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

0
7

जामखेड न्युज——

शिक्षकच आपली दुसरी आई – जयवंतराव आवटे

जामखेड महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

आदर्श जीवनाचा पाया शाळा महाविद्यालयात घडत असतो. शिक्षक, प्राध्यापक आपल्याला आईच्या मायेने संस्कार व ज्ञान देत असतात. यामुळे सन्मानित आयुष्य जगता येते. ज्ञानामुळे जात-पात, स्त्री-पुरूष असा भेद राहत नाही. जीवन जगण्याचे स्कील शाळा महाविद्यालयात मिळते. आणि हे शिक्षक प्राध्यापक देतात म्हणून ते आईच्या जागी असतात. असे मत प्रसिद्ध कथाकथन कार जयवंतराव आवटे यांनी व्यक्त केले.

जामखेड महाविद्यालय जामखेड येथे संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील कटारिया तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकथन कार जयवंतराव आवटे होते यावेळी प्रमुख उपस्थिती दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरूणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीपशेठ गुगळे, संचालक दिलीप चौकटे, शिवाजी कासार, दिपक होशिंग, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य सुनील पुराणे, डॉ. आण्णा मोहिते, डॉ. गौरव म्हस्के, संजय गाडेकर यांच्या सह सर्व प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयवंतराव आवटे म्हणाले की, यशवंतांच्या सन्मानासाठी जयवंताला बोलावले आहे. स्वतः साठी जगण्याचे आयुष्य म्हणजे तारूण्य होय. काॅलेज जीवन महत्त्वाचे आहे. आणि स्नेहसंमेलन महत्त्वाचे आहे. आपली दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संस्था 75 वर्षाची झाली आहे हे खुप महत्त्वाचे आहे. आपली संस्था म्हणून सर्व जण काम करतात. संस्थाचालक व स्टाफ समन्वय तसेच त्यांचे समर्पण आहे. विद्यार्थी दशेत जीवनाचा पाया घडतो. महाविद्यालयात संस्कार व जीवनाचा पाया घडवला जात आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य डॉ. सुनील पुराणे करताना म्हणाले की, वर्षभर घेतलेल्या कष्टाचा कौतुक करण्याचा दिवस म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरण आणि कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. गौरव म्हस्के सांस्कृतिक अहवालाचे वाचन केले महाविद्यालयात वर्षभर विविध कार्यक्रम, विद्यापीठात महाविद्यालयाचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण याबाबत वर्षभर काम केले याचा गुणगौरव करण्यात आला आहे.

क्रीडा विभाग प्रमुख आण्णा मोहिते यांनी क्रीडा अहवाल सादरीकरण केला महाविद्यालयाने 28 सुवर्णपदक मिळवले, चॅम्पियन्स शिप मिळाली, सहा खेळाडूंची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्तरावर निवड, महाविद्यालयाने भारतात दुसरा क्रमांक मिळवला. पारितोषिक वितरणात रांगोळी प्रदर्शन, पोस्टर सादरीकरण, एनसीसी, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, गणित दिन निमित्त गणित पोस्टर यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक यांना पारितोषिक देण्यात आले. एकुण पारितोषिक प्राप्त
190 मध्ये 170 आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत.

यावेळी बोलताना संस्थेचे माजी सचिव
शशिकांत देशमुख म्हणाले की, पारितोषिक मिळवण्यासाठी साधना, सातत्य, परिश्रम असते तसेच स्नेहसंमेलनातून विद्यार्थी प्राध्यापक संस्था समन्वय चांगला राहतो. यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील कटारिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द चिकाटी मेहनत विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात शेला पागोटे कार्यक्रमाने केली. यानंतर जयवंतराव आवटे यांनी मार्गदर्शन
केले व कथा “जाणती” सदा, नागू कथानक असलेली विनोदी व ग्रामीण जीवनाचे सार असणारे कथाकथन सादरीकरण केले.

यावेळी बोलताना संस्थेचे माजी सचिव
शशिकांत देशमुख म्हणाले की, पारितोषिक मिळवण्यासाठी साधना, सातत्य, परिश्रम असते तसेच स्नेहसंमेलनातून विद्यार्थी प्राध्यापक संस्था समन्वय चांगला राहतो. यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक आहे.

स्नेहालय व उड्डाण संस्थेच्या वतीने योगेश अब्दुले यांनी बालविवाह प्रतिबंधक शपथ दिली आभार प्रा. श्याम गोलेकर यांनी मानले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!