Thursday, March 26, 2026
Home ताज्या बातम्या रयत सेवक संतोष मनोहर शिंदे यांचे हृदयविकारक झटक्याने निधन, जामखेड परिसरात शोककळा

रयत सेवक संतोष मनोहर शिंदे यांचे हृदयविकारक झटक्याने निधन, जामखेड परिसरात शोककळा

0
57

जामखेड न्युज—–

रयत सेवक संतोष मनोहर शिंदे यांचे हृदयविकारक झटक्याने निधन, जामखेड परिसरातील शिक्षण क्षेत्रात शोककळा

 

रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड मधील कन्या विद्यालयातील संतोष मनोहर शिंदे ( महातपुरी ता गंगाखेड जि परभणी ) यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी दि ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता हृदयविकरच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

सध्या ते जून २०२५ पासून कन्या विद्यालय जामखेड मध्ये कार्यरत होते. या आधी रयत शिक्षण संस्थेच्या आर पी पी विद्यालय पालशेज जि रत्नागिरी येथे कार्य केले.
अतिशय उपक्रमशील, शिस्तप्रिय शिक्षक म्हणून थोड्याच कालावधीत जामखेड मध्ये त्यांनी नावलौकिक मिळवले होते.
अंत्यविधी त्यांच्या मूळगावी महातपुरी ता गंगाखेड जि परभणी येथे आज सायंकाळी 7 वा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!