ज्योती क्रांतीचे चेअरमन आजीनाथ हजारे यांनी वाढदिवसानिमित्त आरोळे कोविड सेंटरला केली ५५ आॅक्सिजन सिलेंडरची मदत – – – – कर्मचाऱ्यांनी चेअरमनच्या वाढदिवसानिमित्त दिले अकरा क्विंटल धान्य

0
304
जामखेड प्रतिनिधी 
                 जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
  करोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्‍या आरोळे कोविड सेंटरला ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी वाढदिवसानिमित्त पंचावन्न ऑक्सिजन सिलेंडर कोविड सेंटरला भेट देत मदत केली
तसेच जिल्हा परिषद जवळा शाळेत व क्रांती ज्योती शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला मदत व वृक्षारोपण करत समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
     आपल्या चेअरमन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचारी वर्गानी एकत्र येत अकरा क्विंटल धान्य गोळा करून कोविड सेंटरला मदत देऊन अनोख्या पद्धतीने चेअरमनचा वाढदिवस साजरा केला. व चेअरमन साहेबांच्या वाढदिवसाचा वसा कर्मचारी वर्गानी कोविड सेंटरला मदत करत उचलला आहे.
      जामखेड तालुक्यात आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरचे काम हे उल्लेखनिय आहे. राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता आणि कोविड सेंटरला पेशंटची अन्नपाण्यावाचुन अबाळ होऊ नये म्हणुन पुरेसा अन्न- धान्य साठा ज्योती क्रांतीच्यावतीने प्रदान करीत असल्याचे ज्योती क्रांतीचे व्यवस्थापक किरण वर्पे यांनी सांगितले.
    आरोळे हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटलचे संचालक  डॉ. रवी आरोळे आणि डॉ.शोभा आरोळे यांनी सदर मदत स्विकारली. व चेअरमन हजारे व कर्मचारी वर्गाचे आभार मानले व तुमच्या दातृत्वावरच हे कोविड सेंटर चालले आहे असे आरोळे यांनी सांगितले.
      याप्रसंगी ज्योती किरण वर्पे, आप्पासाहेब मुरूमकर, अरविंद हजारे, नितीन आगम, अमोल मेहेर, संतोष पुंड, राजेंद्र राऊत, मुकुंद रोडे, सौ.गायकवाड, अशोक मोहळकर,चंद्रकांत गायकवाड, महेश मोहळकर,गणेश झेंडे यांच्या सह ज्योती क्रांती परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.
         चौकट
  ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अजिनाथ हजारे हे समाजसेवेच्या कामात नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या वर्षी लाॅकडाउन काळात दिड हजार पेक्षा जास्त कुटुंबाला किराणा किटचे वाटप केले होते तसेच तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केले होते. सर्व सामान्य नागरीकांना आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून वेळोवेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात त्याचबरोबर परिसरातील अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असतात. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here