जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या स्वरूपात एक अनमोल भेट दिली आहे. संविधानाचे महत्त्व पुढच्या पिढीला कळावे म्हणून शहरातील लक्ष्मीचौकात
आंबेडकर सर्कल येथे उभारलेल्या संविधान स्तंभाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या संविधान स्तंभामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. असे आमदार रोहित पवार यांनी संविधान स्तंभाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
शहरातील लक्ष्मी चौकात आंबेडकर सर्कल मध्ये
संविधान स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. व या चौकाचे नामकरण संविधान चौक असे करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भारतीय बौद्ध महासभचे सौ.सुरेखा सदाफुले, राजेंद्र पवार, अमोल गिरमे, विकी घायतडक सर,अक्षय घायतडक, राजन समिंदर सर, किशोर काबंळे, प्रतिक निकाळजे, रवि सोनवणे, संदीप तुपेरे यांच्या सह अनेक भीम सैनिक हजर होते.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, जर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाने सर्वाना बरोबर घेऊन चाललो तर देशाची प्रगती निश्चितच होणार आहे. आपण आपला व देशाचा विकास करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे असेही आमदार पवार यांनी सांगितले.