Thursday, March 26, 2026
Home ताज्या बातम्या धक्कादायक बातमी!! गुंडांची जामखेड पोलीसाला लाथाबुक्यांनी मारहाण, शहरात एकच खळबळ

धक्कादायक बातमी!! गुंडांची जामखेड पोलीसाला लाथाबुक्यांनी मारहाण, शहरात एकच खळबळ

0
84

जामखेड न्युज——-

धक्कादायक बातमी!!

गुंडांची जामखेड पोलीसाला लाथाबुक्यांनी मारहाण, शहरात एकच खळबळ

     

शहरात कायदा सुव्यवस्था धोक्यात? पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे यांना चक्क मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. खर्डा चौकात दुचाकीने धडक दिल्यानंतर गुंडांनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेने जामखेडकरांमध्ये भीती पसरली असून, “पोलिसच सुरक्षित नसतील तर जनतेचं काय?” अशी चर्चा सुरू आहे.जामखेड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे सहकाऱ्यासह गुन्ह्याचा पंचनामा करून दुचाकीवरून परतत होते.

खर्डा चौकात मागून आलेल्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. दुचाकीचालक फोनवर बोलत असल्याचं पाहून पोलिसांनी समजावले, मात्र त्याने “तुम्ही पोलीस असले तरी उडत जा!” म्हणत शिवीगाळ केली आणि लोखंडे यांना कानाखाली घातली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

या प्रकरणात शाहनवाज शफीक सय्यद (२४) आणि जिशान शफीक सय्यद (२२), दोघे रा. टाटा टॉवर गल्ली, जामखेड यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

“पोलिसच सुरक्षित नसतील तर जनतेचं काय?” या घटनेने जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिक म्हणतात, “अशा गुंडांवर कठोर कारवाई व्हावी. पोलिसांचा वचक निर्माण झाला नाही तर शहर सुरक्षित राहणार नाही.”

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आता काय पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!