जामखेड न्युज——
केडगांव बीट सभागृह सकारात्मक उर्जेचा स्त्रोत – संभाजी लांगोरे
मिशन आपुलकी अंतर्गत जि.प.प्रा.केंद्रशाळा केडगांव शाळेतील सभागृहाचे नुतनीकरण करुन श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे सभागृहाचे नामकरण करण्यात आले. यावेळी लागोरे यांनी केडगाव बीट सभागृह म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे विधान केले जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी या उपक्रमातंर्गत केडगाव बीटच्या विस्तार अधिकारी निर्मला साठे यांच्या संकल्पनेतुन सदर सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,
मुख्याध्यापक, शिक्षक,माजी विदयार्थी व इतर शिक्षण प्रेमी यांच्या भौतिक सुविधा व वस्तुरुप सहभागाबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे भरभरून कौतुक केले आहे.
केडगाव बीट विस्तार अधिकारी निर्मला साठे यांच्या प्रामाणिक कार्यामुळे सर्व शिक्षकांनी त्यांना प्रतिसाद दिल्याचेही श्री.लांगोरे म्हणाले. सर्वांच्या सदहेतूमुळे सभागृह हे सकारात्मक उर्जास्रोत बनले असुन संपुर्ण जिल्हयासाठी मार्गदर्शक असे कामकाज केडगांव बीटाने केले असल्याचेही लांगोरे म्हणाले.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी बीट विस्तार अधिकारी निर्मला साठे यांच्या कार्याचा सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी एक शाळा दत्तक घेवून मिशन आपुलकी अंतर्गत कामकाज करणेचे आवाहन केले असुन सर्वांचे कौतुक केले आहे.
लेखाधिकारी श्री रमेश कासार यांनी लांगोरे साहेबांच्या प्रेरणेनेच मिशन आपुलकी हा उपक्रम सुरू झाला असून या शैक्षणिक वर्षांमध्ये आत्तापर्यंत आठ कोटी रुपयांची मदत प्राथमिक शाळांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाल्याचे सांगितले. तसेच हे सभागृह पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अनेक मीटिंगसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
यावेळी संगीता कदम बापूसाहेब तांबे व माध्यमिक शिक्षक दिपक काकडे यांनीही विस्ताराधिकारी साठे मॅडमच्या सर्व समावेशक धोरणाबद्दल व केडगाव बीट मधील सर्व शिक्षकांच्या मदतीबद्दल गौरवोद्गार काढले याप्रसंगी प्रभारी उपशिक्षणाधिकारी श्री विलास साठे ,श्रीम. जयश्री कार्ले, गट शिक्षणाधिकारी श्री . बाबुराव जाधव, विस्तार अधिकारी श्री. चंद्रकात सोनार, रवींद्र कापरे, केंद्र प्रमुख श्री. किशोर हारदे, बाळासाहेब दळवी, उदयकुमार सोनावळे दिलीप दहीफळे ,श्रीम. सुनंदा शिंदे मुख्याध्यापक मंगला कोठवळ हे उपस्थित होते.
श्री. बापू तांबे यांनी सर्वांची भोजन व्यवस्था केली. यावेळी
श्री सुभाष काळे , रमजान शेख,राजेंद्र खडके ,अच्युत घूले, संतोष गवळी,सोमनाथ मोरे, युवराज गारुडकर, प्रकाश कार्ले, श्री. लोमटे, बी.के. बनकर, सुमेधावती शेजूळ ,संगिता कदम, ज्योती भोर, जयश्री निमसे, जयश्री लोंढे , केंद्रशाळा केडगांव सर्व शिक्षिका व विशेष शिक्षिका सौ. माया हराळ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले
सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे व नितीन पंडित यांनी केले तर दिलीप दहिफळे यांनी आभार मानले यावेळी केडगाव बीट मधील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या
चौकट
यावेळी यूपीएससी परीक्षेमधून बुरुडगाव येथील विशाल पवार या विद्यार्थ्याची लेफ्टनंट कर्नल पदी निवड झाल्याबद्दल त्याच्या वर्गशिक्षिका श्रीमती मंगल पवार तसेच केडगाव शाळेतील शिक्षिका शोभा काळे यांची कन्या कुमारी प्रियवंदा हिची एमपीएससी परीक्षेतुन उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शोभा काळे व संजय धामणे यांचा लांगोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला