अडीच लाख रुपयांचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ जामखेड पोलीसांनी पकडला जामखेड मधील रॅकेट कधी पकडणार ?

0
246

जामखेड न्युज——

अडीच लाख रुपयांचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ जामखेड पोलीसांनी पकडला

जामखेड मधील रॅकेट कधी पकडणार ?

जामखेड पोलीसांनी ईट ता. भूम जि. उस्मानाबाद येथून नगरकडे जाणाऱ्या संशयास्पद ट्रकला अडवून त्यातील काळ्या बाजारात जाणारा १५ हजार किलो तांदूळ जामखेड पोलीसांनी पकडला साधारण २ लाख ५० हजार रूपये किमतीच्या तांदळासह ८ लाख रुपये किमतीचा ट्रक असा १० लाख ५० रूपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीसांनी जप्त केला असून या जबरदस्त कामगिरीबद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण जामखेड मध्येही रेशनचा गहू तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्रीसाठी जातो यात पांढरपेशा लोकांचे रँकेट आहे हे जामखेड पोलीस कधी पकडणार? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

या बाबत फिर्यादी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल अरुण तुकाराम पवार, (वय-३२) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजताचे सुमारास मी (अरुण पवार) व पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल संदिप राऊत, संदिप आजबे, व महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा घोगरे असे आम्ही जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग गस्त करीत असताना रात्री ११:१५ वाजताचे सुमारास आम्हाला हिमालय पेट्रोलपंप नगर रोड जामखेड येथे मालट्रक क्र. एम.एच.15 सी.के.0191 हा नगर रोडकडे जात असताना दिसला. तो संशयितरित्या वाटल्याने ट्रक थांबवून चालकास नाव गाव विचारले असता त्याने शिवाजी बबन गफाट, (वय ३७) वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी. जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले. वाहनात काय आहे असे विचारले त्याने सदर ट्रक मध्ये २१० तांदळाच्या गोण्या असल्याचे सांगितले. त्यास सदर तांदळाची पावती आहे का वगैरे सखोल चौकशी केली असता त्याने के. बी. वाघवकर वेट ब्रीज येथील पावती क्रमांक 4914 ही पावती दाखवली ज्यात गाडीसह एकुण वजन 22450 किलो त्यात गाडीचे वजन 7460 किलो व मालाचे वजन 14990 किलो असल्याचे दिसुन आले. सदरचा माल अमर वसंत लवटे (वय 31 वर्षे) धंदा-व्यापार, रा. ईंट ता. भुम.जि. उस्मानाबाद यांचे आडत दुकानातुन भरलेला असुन MAGR सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले.

सदरील ट्रकमधील तांदुळ पांढ-या रंगाच्या गोणीत असल्याने त्याच्यी पाहणी करता सदरील तांदुळ जिवनावश्यक वस्तु अधिनियम मधील सार्वजिनक वितरणाचा असल्याबाबत संशय असल्याने आम्ही सदर रात्री 23/42 वा पोलीस ठाणे येथे आरक्षित केला व त्याबाबत चालकास लेखी समज दिली.
याबाबत दि. २५ नोव्हेंबर रोजी जामखेडचे तहसीलदार यांच्याकडे चौकशी केली असता हा बाबत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच आपण संशयित वाहनाची अधिक चौकशी करून कार्यवाही करावी व सदरचा माल हा सार्वजनिक वितरणाचा असल्यास आम्हास कळावे असा अभिप्राय दिला. याप्रकरणी चालकाची आंम्ही पुन्हा विचारपुस केली असता सदरील तांदुळ हा केडगाव अ. नगर येथे घेवून जात असल्याचे सांगितले.

त्यानंतर आंम्ही पोहेकॉ संजय लोखंडे यांनी तात्काळ दोन पंचाना पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवुन आरक्षिक केलेला सदर ट्रक व तांदूळ याची पाहणी करुन मालट्रक क्र-एम.एच.15 सी.के. 0191 ट्रकची अंदाजे किंमत 8,00,000 व एकूण 210 गोणी तांदुळ वजन एकुण 14990 किलो 2,50,000/- रु. असा एकूण 10.50,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल अरुण तुकाराम पवार, (वय-३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक नामे-शिवाजी बबन गफाट, वय 37 वर्षे, रा. इंदापुर, ता. वाशी. जि. उस्मानाबाद याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.

जसा हा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा माल पकडला तसा जामखेड मधुन मोठ्या प्रमाणात रेशनचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जातो तो कधी पकडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here