खर्डा रोडवर झालेल्या मोटारसायकल अपघातात तरूणाचा मृत्यू

0
394

जामखेड न्युज——

खर्डा रोडवर झालेल्या मोटारसायकल अपघातात तरूणाचा मृत्यू

मोटर सायकल अपघातात सोमवारी (ता.२८) तालुक्यातील बाळगव्हाण येथील मोटारसायकलस्वार गोविंदा भीमराव कराड (वय १८ ) याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे यांनी सकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दूरध्वनी द्वारे दिल्यानंतर कोठारी यांनी तातडीने आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले. जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर खर्डा रस्त्यावर गोविंदा कराड हा झाडे झुडपात रस्त्याच्या कडेला मोटरसायकल सह पडलेला आढळला. तो आपल्या चुलत्याकडे पुण्याला ऊस तोडणी साठी गेला होता. परंतु काल गावाकडे येत असताना त्याचा मोटरसायकल (क्रमांक एम एच १६ ए एक्स ९२९०) वरून जात असताना अपघात झाला.

ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेह आणल्यानंतर एक तास रूग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ आली. कारण ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्ण तसेच मृतदेह उतरायला कर्मचारीच नसल्याची बाब समोर आली. पर्यायाने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीच पुढाकार घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या सहकार्याने शवविश्छेदन खोली पर्यंत घेऊन गेले.

सदर घटनेची जामखेड पोलिसांना खबर अर्जुन कराड यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी त्यास मृत घोषित करून शवविश्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
यावेळी विनय डुकरे ,आकाश सानप,मोहित मिसाळ, बिभीषण सांगळे यांनी मदत केली

चौकट –

जामखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्मचारी नसल्यामुळे मला स्वतःलाच ५०० फूट मृतदेह स्ट्रेचर वर टाकून इतरांच्या मदतीने शवविश्छेदन खोलीपर्यंत मध्ये टाकावा लागला.

– संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here