जामखेड न्युज——
भाजपाचे कार्यकर्ते चपटी मारून शेतकऱ्यांची दिशाभूल करतात – रमेश आजबे
वीज प्रश्नी महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या बळीराजा दिलासा देण्याऐवजी शिंदे – फडणवीस सरकारने वीज बीलाच्या माध्यमांतून जुलमी वसुली हाती घेतली आहे. यातच भाजपाचे काही कार्यकर्ते चपटी मारून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. म्हणतात उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत कोणाचीही वीज कनेक्शन कट करू नका पण महावितरण म्हणते आम्हाला तसे आदेश नाहीत एकतरी बील भरावे लागेल. भाजपा कार्यकर्ते मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आक्रोश मोर्चाच्या वेळी व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, संजय वराट, पाटोद्याचे माजी सरपंच समीर पठाण, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले, राजेंद्र पवार, बाकीचे सरपंच निलेश पवार, इस्माईल सय्यद, भिमराव लेंडे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश आजबे म्हणाले की,
महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे सर्व वीज बील भरावे. वीज बील वसुलीच्या नावाखाली महावितरणने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही,असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश (दादा) आजबे यांनी दिला.
मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना दिले यांनी शासनापर्यत आपल्या भावना पोहचवल्या जातील असे सांगितले.
अंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यावेळी राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, संजय वराट, पाटोद्याचे माजी सरपंच समीर पठाण, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले सह आदींची भाषणे झाली. सर्वांनीच शिंदे – फडणवीस सरकार विरोधात टीकेची झोड उठवली. शेतकरी विरोधी शिंदे –
फडणवीस सरकारचा यावेळी सर्वच नेत्यांनी
तीव्र शब्दांत निषेध केला.
प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले की, केंद्र सरकार गुजरातला जास्तीत जास्त सवलती देत आहे महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे.
दत्ता वारे म्हणाले की, हे इडी सरकार म्हणजे अलिबाबा व चाळीस चोरांचे सरकार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. भाजपा शिंदे सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.