जामखेड न्युज——
क्रीडा स्पर्धेत ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश
शाळेच्या वतीने यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षकाचा सन्मान
नुकत्याच नागेश विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धेत ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी स्पर्धक व क्रीडा शिक्षकाचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रिले या स्पर्धा प्रकारात हितेश शास्त्रकार, ओम गांधी, शुभम डिसले, रूद्राक्ष कदम आणि वेदांत लोहकरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
तसेच हितेश शास्त्रकार ने 100 मि रनिंग मध्ये तिसरा क्रमांक व 200 मि रनिंग मध्ये दूसरा क्रमांक पटकाविला.
गोळा फेक यामधे शुभम डिसले याने दूसरा क्रमांक मिळवला
थाळी फेक मधे पृथ्वीराज डोके याने दूसरा क्रमांक मिळविला
तसेच तिहेरी उडी यामधे यशराज हळनावर याने प्रथम क्रमांक पटकाविला.
आणि मुलीच्या गटात गोळा फेक मधे प्राची पवार हिने दूसरा क्रमांक व हिंदवी राळेभात हिने तिसरा क्रमांक मिळविला आणि थाळी फेक मधे साक्षी लोहकरे हिने दूसरा क्रमांक व हिंदवी राळेभात हिने तिसरा क्रमांक मिळविला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी क्रीडा शिक्षक सुभाष सर यांचाही सत्कार करण्यात आला शाळेच्या संस्थापिका माने मॅडम शाळेचे प्राचार्य अभिजीत उगले व सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने तसेच जाकीर शेख सर यांनी केले आहे.