जामखेड न्युज——-
गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा ल. ना. होशिंग विद्यालयात सन्मान
आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे -प्राचार्य श्रीकांत होशिंग
ल. ना. होशिंग विद्यालयातील शिक्षक कर्मचारी व त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवले आहे. यांचा सन्मान संविधान दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत होशिंग होते. यावेळी उपमुख्याध्यापक रमेश आडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे यांच्या सह अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या खेळामध्ये नैपुण्य मिळवलेल्या तनश्री विशाल पोले, रिया भागवत सुपेकर, कुस्तीपटू बापूसाहेब जरे, कलाशिक्षक राऊत मुकुंद यांचा सत्कार करण्यात आला.
कुमारी तनश्री पोले जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून तिची औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला
कुमारी रिया सुपेकर भागवत बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यामुळे तिचीही औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिचाही सत्कार करण्यात आला.
ल.ना.होशिंग विद्यालयातील शिक्षक कुस्तीपटू बापूसाहेब जरे अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर कलाशिक्षक राऊत मुकुंद अहमदनगर येथे शासकीय रेखा कला परीक्षा मूल्यमापन केंद्र मुंबई कला संचालनाच्या वतीने प्रथमतः सुरू करण्यात आले.त्या ठिकाणी इलेमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा एक्झामिनर म्हणून काम करण्याची संधी मिळाली,त्याबद्दल ल.ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आपणही कठोर परिश्रम घेऊन आपल्याला कोणता खेळ आवडतो किंवा कोणतीही एखादी कला शिकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय व्हायचे आहे हे ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यास करावा लागेल त्याचबरोबर आरोग्यही महत्त्वाचे आहे हे सांगितले. यावेळी ईश्वर कोळी भाऊसाहेब व रामचंद्र होशिंग भाऊसाहेब उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय क्षीरसागर, साईराज भोसले, निलेश भोसले, आदित्य देशमुख, सुरज गांधी किशोर कुलकर्णी, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे व शिक्षक प्रतिनिधी, रोहित घोडेस्वार, हनुमंत तात्या वराट,आशिष काळे सर्वांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले,आभार प्रदर्शन भरत लहाने यांनी केले.