जामखेड न्युज——
संविधानाच देशाचा आत्मा आहे -न्यायाधीश जोशी
ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न
भारतातील संविधानानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, शिक्षण,समता,धार्मिक, सांस्कृतिक,मूलभूत हक्क आहेत संविधानामुळे सर्वांना आपले हक्क मिळतात. संविधानाच देशाचा आत्मा आहे न्यायाधीश व्ही व्ही जोशी यांनी संविधान दिनानिमित्त मत व्यक्त केले.
आज 26 नोव्हेंबर 2022 ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड मध्ये संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.त्यावेळी जामखेड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व्ही.व्ही.जोशी व न्यायाधीश एस. बी.नवले, श्रीकांत होशिंग, मधुकर राळेभात वकील संघाचे अध्यक्ष संग्राम पोले व न्यायालयातील विधिज्ञ व सर्व भाऊसाहेब त्याचबरोबर ल.ना.होशिंग विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्वांच्या उपस्थित न्यायाधीश साहेबांच्या हस्ते भव्य संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पूजन करुन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अनिल देडे एनसीसी विभाग प्रमुख यांनी संविधान उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन केले. पर्यवेक्षक बाळासाहेब आप्पा पारखे यांनी संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्षे 11 महिने 18 तास लागले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली व 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले. पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे मनोगत व्यक्त केल्यानंतर
या प्रसंगी संविधान दिनानिमित्त ल ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर सर्वांनी डॉ जगदीश चंद्र बोस बोटनिकल गार्डनला भेट दिली व तेथील विविध उपयुक्त औषधी वनस्पतींची माहिती घेतली त्यावेळी न्यायाधीश श्री व्ही जोशी व न्यायाधीश श्री नवले त्यांनी उत्कृष्ट उपक्रमाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग व विद्यालयाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या वेळी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री व्ही जोशी, न्यायाधीश एस बी नवले, वकील संघटना तालुका अध्यक्ष संग्राम पोले, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक रमेश अडसूळ, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे, अँड नागरगोजे, वारे, थोरात, सपकाळ, लिपिक विनोद नाईकनवरे समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे, शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेस्वार, एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, जामखेड तालुका शिक्षक संघटना अध्यक्ष प्रवीण गायकवाड,भरत लहाने कलाशिक्षक राऊत मुकुंद, बबनराव राठोड,पोपट जगदाळे,कैलास वराट, हनुमंत वराट, विशाल पोले, साई भोसले, आदित्य देशमुख, हनुमंत वराट तात्या, आशिष काळे सर्व उपस्थित होते.