श्री नागेश विद्यालय विद्यार्थ्यांचा थेट संवाद; गुरुकुल प्रकल्पांतर्गत अकाश शेठ बाफना इंडस्ट्रीजला क्षेत्रभेट मिनरल वॉटर ते पॉलिमर उत्पादन प्रक्रियेची जाणून घेतली माहिती
श्री नागेश विद्यालय विद्यार्थ्यांचा थेट संवाद; गुरुकुल प्रकल्पांतर्गत अकाश शेठ बाफना इंडस्ट्रीजला क्षेत्रभेट
मिनरल वॉटर ते पॉलिमर उत्पादन प्रक्रियेची जाणून घेतली माहिती
रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत श्री नागेश विद्यालय, जामखेड येथील विद्यार्थ्यांची बाफना इंडस्ट्रीज, जामखेड येथे शैक्षणिक क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पडली. विद्यालयाचे प्राचार्य मडके बी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, व्यावसायिक कौशल्य आणि औद्योगिक प्रक्रिया समज विकसित करणे हा होता.
या भेटीदरम्यान इंडस्ट्रीचे संचालक आकाश बाफना यांनी विविध विभागांची माहिती देत उद्योगातील कामकाजाची ओळख करून दिली.
परशुराम भांगे, अशोक कुमटकर, ऋषिकेश निकाळजे, आख्तर शेख आणि सुमित पिपळा यांनी मिनरल वॉटर, पॉलिमर, वॉटर बॉटल, पीव्हीसी पाइप निर्मिती, कच्चामाल ते तयार उत्पादने व विक्री प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलिमरपासून बॉटल निर्मिती, बिसलरी युनिटची कार्यप्रक्रिया, तसेच विविध यंत्रसामुग्रींचे प्रत्यक्ष निरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी ‘जलमोती’ ब्रँडची शुद्ध पाण्याची बॉटल कशी तयार होते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
गुरुकुल प्रमुख ससाणे एस. आर., एनसीसी विभाग प्रमुख मयूर भोसले तसेच क्षेत्रभेट विभाग प्रमुख कृष्णा मुरकुटे, संतोष पवार, अशोक चौधरे, यादव एस. व्ही., ज्ञानेश्वर शेटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसह प्रकल्पाची माहिती घेतली. शेवटी विद्यालयाने बाफना इंडस्ट्रीजच्या सर्व कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.