रिया भागवत सुपेकर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
219

जामखेड न्युज——

रिया भागवत सुपेकर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम विभागीय स्पर्धेसाठी निवड

कु. रिया भागवत सुपेकर हीने राजस्थानी पोद्दार स्कुल परळी येथे झालेल्या चौदा वर्षाखालील वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तिचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले आहे तसेच तिला पुढील विभागीय स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

तिच्या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, क्रीडा शिक्षक अजीम शेख, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, मार्गदर्शक शिक्षक सागर गांधी नातेवाईक व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.

रिया ही इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असुन ती अनिशा ग्लोबल आष्टी येथे शिकत असुन जिल्हास्तरावर गोल्ड मेडल जिंकल्यामुळे औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशामुळे जामखेड परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here