जामखेड न्यूज—–
कमीत कमी व्याजदर व जास्तीत जास्त कर्जवाटप करणार – संचालक संतोष राऊत
बापुसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कारभारामुळे पुन्हा सत्ता -किसनराव वराट
नायगाव केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न

कमीतकमी व्याजदर व जास्तीत जास्त कर्जवाटप या तत्त्वावर बँकेचा कारभार करणार तसेच माझे संचालक पद हे सर्व शिक्षक बँकेच्या सभासदांना समर्पीत करतो आणी त्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री संतोषकुमार राऊत यांचा आज नायगाव केंद्रातील शिक्षकांच्या वतीने जि. प. प्रा. शाळा महात्मा फुले नगर(शिउर)येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री किसन वराट हे होते.
यावेळी शिक्षकांमध्ये श्री. केशवराज कोल्हे व श्री. अविनाश पवार सर यांनी मनोगतामध्ये भावी कार्यकाळात बँकेचा कारभार चांगला करावा यासह विविध प्रश्न व मागण्या मांडल्या.

नवनिर्वाचित संचालक श्री संतोष राऊत यांनी आपल्या भाषणांमधून येणाऱ्या काळात व्याजदर कमी व कर्जवाढ हे निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच हे संचालक पद सर्व शिक्षकांना समर्पित करून बँकेच्या हितासाठीच कारभार करणार असल्याचे संगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्य नेते श्री किसन वराट साहेब यांनी सभासदांनी जिल्हा नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वावर व मागील अडीच वर्षातील उत्कृष्ट कारभारामुळे सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याचे सांगितले.
यावेळी केंद्रातील श्री तनपुरे सर,परखड सर,निलेश गरड,किरण दापेगावकर,चव्हाण सर,लव्हाळे सर,कदम सर,श्रीम बांगर मॅडम,उनवणे मॅडम,शिंगाडे मॅडम यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री जालिंदर यादव यांनी तर आभार प्रदर्शन श्री नामदेव गर्जे सर यांनी केले.


