Sunday, March 29, 2026
Home शैक्षणिक बातम्या तनुश्री पोले हिस जिल्हास्तरीय आर्चरी धनुष्यबाण स्पर्धेत गोल्ड मेडल विभागीय स्पर्धेसाठी निवड

तनुश्री पोले हिस जिल्हास्तरीय आर्चरी धनुष्यबाण स्पर्धेत गोल्ड मेडल विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
361

 

जामखेड न्युज—–

तनुश्री पोले हिस जिल्हास्तरीय आर्चरी धनुष्यबाण स्पर्धेत गोल्ड मेडल विभागीय स्पर्धेसाठी निवड

ल ना होशिंग माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील संगणक तज्ञ व समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख विशालजी पोले यांची मुलगी तनुश्री पोले ( तनू ) जिल्हास्तरावरील आर्चरी ( धनुष्यबाण) स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले मिळाले आहे. तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिची निवड विभागीय स्तरावर झाली आहे तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक तसेच प्राचार्य श्रीकांत होशिंग, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले, क्रीडा शिक्षक अजीम शेख, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, अनिल देडे, विजय क्षिरसागर यांच्या सह अनेक मित्रमंडळी, कुटुंबीय व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

तनुश्री ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असुन ती अनिशा ग्लोबल आष्टी येथे शिकत असुन जिल्हास्तरावर गोल्ड मेडल जिंकल्यामुळे औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशामुळे जामखेड, आष्टी व करमाळा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!