जामखेड न्युज——
राजुरी जवळ डिझेलचा टँकर पलटी,
डिझेल भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड
प्रशासन घटनास्थळी दाखल
जामखेड कडून खर्ड्याकडे जात असलेला टँकर राजुरी गावाजवळ टायर फुटल्याने पलटी झाला. यामुळे डिझेलची टाकी फुटल्याने डिझेलचा पाट वाहत होता. हि बातमी नागरिकांना समजताच नागरिकांनी जे सापडेल ते ड्रम, कँन, बादली हातात घेऊन डिझेल भरण्यासाठी एकच झुंबड गर्दी केली होती. सुदैवाने पेट्रोल ची टाकी शाबुत राहिल्याने मोठा अनर्थ टळला.
जामखेड कडून खर्ड्याकडे चाललेला एम एच १६ बीसी १३१४ या क्रमांकाचा डिझेल चा टँकर टायर फुटल्याने राजुरी गावाजवळ पलटी झाल्याने डिझेल टाकी फुटल्याने डिझेल चा पाट वाहत होता. स्थानिक नागरिकांना ही बातमी कळताच हातात जे सापडेल ते घेऊन डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुदैवाने पेट्रोलची टाकी शाबुत राहिल्याने अनर्थ टळला या मार्गावरून मयुर भोसले हे शिक्षक येत असताना त्यांनी ताबडतोब प्रशासनाला संपर्क केला ताबडतोब पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.