Sunday, November 22, 2026
Home शैक्षणिक बातम्या राष्ट्रीय स्तरावर ल. ना. होशिंग विद्यालयाची पायल गवळी चमकली! थाळीफेकमध्ये भारतात सातवा...

राष्ट्रीय स्तरावर ल. ना. होशिंग विद्यालयाची पायल गवळी चमकली! थाळीफेकमध्ये भारतात सातवा क्रमांक पटकावत जामखेडचा नावलौकिक उंचावला! शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. पायल गणेश गवळीची उल्लेखनीय कामगिरी, विद्यालयासह जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा!

0
3
राष्ट्रीय स्तरावर ल. ना. होशिंग विद्यालयाची पायल गवळी चमकली! थाळीफेकमध्ये भारतात सातवा क्रमांक पटकावत जामखेडचा नावलौकिक उंचावला!  शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. पायल गणेश गवळीची उल्लेखनीय कामगिरी, विद्यालयासह जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जामखेड न्युज – – —-

राष्ट्रीय स्तरावर ल. ना. होशिंग विद्यालयाची पायल गवळी चमकली! थाळीफेकमध्ये भारतात सातवा क्रमांक पटकावत जामखेडचा नावलौकिक उंचावला!

शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. पायल गणेश गवळीची उल्लेखनीय कामगिरी, विद्यालयासह जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा!

क्रीडा क्षेत्रात आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर यशाची नवनवी शिखरे गाठणाऱ्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कु. पायल गणेश गवळी हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या थाळीफेक प्रकारातील अंतिम फेरीत पायलने भारतात सातवा क्रमांक पटकावत जामखेडच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक उंचावला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील खेळाडूंशी स्पर्धा करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे आणि देशात सातवे स्थान मिळवणे ही पायलच्या मेहनतीची, सातत्याची आणि क्रीडा कौशल्याची पोचपावती आहे. तिच्या या यशामुळे ल. ना. होशिंग विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

पायलला क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, बापू जरे, धीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

पायलने मिळवलेल्या या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी उपाध्यक्ष दिलीप गुगळे सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया माजी सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे सर्व संचालक मंडळविद्यालयाचे प्राचार्य बी ए पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे , पर्यवेक्षक सुदाम वराट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय स्तरावर सातवे स्थान मिळवणाऱ्या पायलचे हे यश जामखेडमधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!