जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात राजकीय भुकंप
आमदार रोहित पवारांना धक्का, आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
आगामी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जीवस्ती, घुलेवस्ती, बांगरवस्ती या खर्डा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे जामखेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. या प्रवेशामुळे
आमदार रोहित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी व उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला. जामखेड तालुक्यातील राजुरीला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. मात्र राजुरी गावातील बडे राजकीय प्रस्थ माजी सरपंच सुभाष काळदाते यांनी आपल्या २०० समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश करत जामखेड तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. प्रवेश केलेले काळदाते यांचे सर्व समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. राम शिंदे यांनी माजी सरपंच सुभाष काळदाते यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे भाजपात स्वागत केले. व राजुरीकरांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनल बहुमताने निवडून आणा, तुमच्या पाठीशी सर्व ताकद लावू, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे. असा शब्द यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आजीनाथ हजारे , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, प्रविण चोरडिया, डाॅ अल्ताफ शेख, प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब ढगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी मध्ये गुलाम होऊन राहणारालाच सन्मान मिळतो.भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे नेहमीच सर्वांनाच सन्मानाची वागणुक मिळते या गोष्टीचाही आम्ही अनुभव घेतला आहे. अशा भावना राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊन, दिशाभूल करून, अमिष दाखवुन आमचे मतं घेतली. आम्हीही या गोष्टींना बळी पडलो, ही आमची खुप मोठी चुक होती. आम्हीही आमच्या सोबत असलेल्या मतदार जनतेला यांच ऐकुण आश्वासन दिली. विकासाचे स्वप्न दाखवले. परंतु प्रत्यक्षात अस काही झाल नाही. त्यामुळे सर्वसामान्य मतदार नाराज झाला आहे.
मत घेताना सर्वांना जवळ घेतल मात्र निवडुन आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवल जायच त्यांनाच विचारात घेतलं जात, आम्ही काही कामासाठी भेटायला गेलो तरी भाजपातुन आलेले आहेत. म्हणुन दुर ठेवलं जायचं, कामही त्यांनाच दिली जायची, आम्ही बोगस काम होत आहेत अशा तक्रारी केल्या तरी विकासकामात अडथळा आणु नका म्हणुन धमकावलं जायचं. कारण त्यांच्या जवळच्या लोकांना कामात भ्रष्टाचार करता यावा, मनमानी पध्दतीने काम करता यावीत. या गोष्टींची तक्रार आम्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडेही अनेक वेळा केली. तेही सांगायचे आम्हालाच विचारात घेतलं जात नाही तिथं तुम्हाला कोण विचारणार तुमचा तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यचं असेल.
कायम अपमानास्पद मिळणा-या वागणुकीला कंटाळुन आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रा आ राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवून भाजपात प्रवेश केला आहे.आमच्याकडुन जी चुक २०१९ ला झाली त्याची दुरूस्ती आम्ही २०२४ ला करूनच दाखवु. असा जाहिर निर्धार यावेळी राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील उपस्थितांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया.
भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केल्यानंतर , आ प्रा राम शिंदे त्यांच्या नेतृत्वात गावाचा विकास करणार असल्याचा निर्धार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे.
– सुभाष काळदाते
माजी सरपंच राजूरी
चौकट
भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती, बांगरवस्ती आणि खर्डा परीसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचे मी स्वागत केले आहे. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देतानाच त्याभागातील प्रश्र प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
– आमदार प्रा.राम शिंदे