अनेक दिवसांपासून रखडलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम सुरू अंतर कमी करण्यासाठी व्यापारी शिष्टमंडळ खासदारांच्या भेटीला

0
364

जामखेड न्युज——

अनेक दिवसांपासून रखडलेल्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम सुरू

अंतर कमी करण्यासाठी व्यापारी शिष्टमंडळ खासदारांच्या भेटीला

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास आजपासून सुरवात झाली आहे. यामध्ये सध्या पहिल्या टप्प्यात बीड रोड नवले पंपाच्या वरील बाजुच्या ठिकाणाहुन ते सौताड्या पर्यंत या चारपदरी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.आज शुक्रवार दि. १८ रोजी कामास सुरुवात झाली आहे.

जामखेड शहर राष्ट्रीय महामार्गाने जोडले जात असतानाच, जामखेड शहरांतर्गत ३ हजार ६२५ मीटर लांबीचा रस्ता हा चारपदरी करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने याकामाची निविदा प्रक्रिया २७ सप्टेबर २०२२ रोजी पुर्ण केली होती. पुणे येथील धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाची निविदा मिळाली आहे. या कामाची अंदाजपत्रकीय मंजूरी रक्कम १५७ कोटी ६२ लाख रूपये होती. प्रत्यक्ष प्रकल्पाची निविदा रक्कम १३३ कोटी २७ लाख रूपये होती. मात्र ठेकदाराची निविदा करार किंमत ३५ कोटी ४० लाखाने कमी होवून, ८६ कोटी ९ लाख रूपये झाली आहे.

काही महीन्यापुर्वीच या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अंतर्गत जामखेड शहरांतर्गत चारपदरी रस्त्याचे कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली होती. कार्यारंभ आदेश होवून साधारण दोन महिण्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार होती. त्याच अनुषंगाने या राष्ट्रीय महामार्गाच्या बातत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आसल्याने आज दि १८ नोव्हेंबर रोजी सकाळी या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे भुमीपुजन नुकतेच धनश्री कंस्ट्रक्शन चे संचालक राजेंद्र देशपांडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शरद कार्ले, विकास (तात्या) राळेभात, वसंत राळेभात, उद्धव हुलगुंडे सह अनेक जण उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या महामार्गाला सहा वर्षापुर्वी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला होता. या महामार्गाच्या अंतर्गत जामखेड शहरातंर्गत ३ हजार ६२५ मीटर लांबीचा चारपदरी रस्ता व पुढे जामखेड पासून सौताड्यापर्यंत १० मीटर रूंदीचा काँक्रीट रस्ता करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील (पंचदेवालय) कोठारी पेट्रोलपंप ते बीड रस्त्यावरील सौताडा गावापर्यंत तब्बल १४ किलोमीटर अंतराचे हे काम आहे.

यापैकी जामखेड शहरांतर्गत ३ हजार ६०० मीटर लांबीचा चारपदरी रस्ता करण्यात येणार आहे. साधारण हा रस्ता कोठारी पेट्रोलपंप ते बीड रस्त्यावरील नवले सीएनजी पंपापर्यंत चारपदरी करण्यात येणार आहे. जामखेड शहरांतर्गत ३० मीटर रूंदीचा चारपदरी रस्ता करताना या रस्त्यावर मधोमध रोड दुभाजक, दोन्ही बाजूने साडेसात मीटर रूंदीचा काँक्रीटीकरण रस्ता, पाच मीटर रूंदीचे डांबरीकरण व १.३० मीटर रूंदीचे फुटपाथ व साईड गटार असा ३० मीटर रूंदीचा रस्ता करतानाच, या रस्त्यावर दुभाजकाच्या मधोमध स्टेटलाईट बसविण्यात येणार आहे.

नवले पंपापासुन सध्या हा रस्ता पुढे सौताड्या पर्यंत जरी सुरू झाला असला तरी अद्याप नगररोड येथील पंचदेवालय ते नवले पंप या शहरातुन जाणार्‍या रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आसल्याने या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्या नंतरच या शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे आनखी काही दिवसतरी जामखेड शहरातील नागरिकांना खड्डे व धुळीचा सामना करावा लागणार आहे. मात्र शहरातील देखील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जामखेड शहरातील नागरिकांन कडुन होत आहे.

चौकट

जामखेड ते सौताडा होणाऱ्या महामार्गाबाबत चर्चा झाली. यामहामार्गावर येणाऱ्या जामखेड येथिल पंचदेवालय ते दूधडेअरी या दरम्यानचे दोन्ही बाजूने अंतर कमी करावे. ज्यामुळे जामखेड येथिल व्यापारी, दुकान व घर यांचे कोणातेही नुकसान होणार नाही. यासाठी जामखेड येथील शिष्टमंडळ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भेटले व व्यापाऱ्यांच्या सहीचे निवेदन खासदार सुजय विखे यांच्याकडे देण्यात आले त्यावर त्यांनी त्वरित संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कोणाचे नुकसान न होता योग्य मार्ग का मार्ग काढण्यात येईल असे सांगितले. यावेळी व्यापारी अशोक शिंगवी,आकाश बाफना, सुभाष भळगट, पिंटू बोरा, सुधीर जगताप, अष्टेकरसह व जामखेड मधील अनेक व्यापारी हजर होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here