जामखेड न्युज——
साकतमध्ये होणार नवीन स्वस्त धान्य दुकान -चेअरमन कैलास वराट
तालुक्यातील साकत हे गाव आकारमानाने व लोकसंख्येने मोठे आहे गावात दोन स्वस्त धान्य दुकाने आहेत. बहुसंख्य लोकांची मागणी लक्षात घेऊन साकत सेवा संस्थेचे नविन स्वस्त धान्य दुकान असावे म्हणून सेवा संस्थेमार्फत अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई येथे राॅयल स्टोन बंगल्यावर जाऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन देण्यात आले होते यानुसार साहेबांनी पत्राचा विचार करत ताबडतोब संबंधित विभागास आदेश देण्यात आले त्यामुळे लवकरच साकतमध्ये नवीन स्वस्त धान्य दुकान होणार यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाने वातावरण आहे. अशी माहिती साकतचे चेअरमन कैलास वराट यांनी दिली.
साकत वि. का. सेवा सोसायटी लि. साकत, ता. जामखेड, जि. अहमदनगर या संस्थेची पंचकमिटी/ संचालक सभा दिनांक ०७/११/२०२२ रोजी झाली असता सदर सभेत साकत येथील स्वस्त धान्य दुकान मिळणेबाबत ठराव करण्यात आला होता.
साकत वि. का. सेवा सोयायटी लि. साकत या नांवे संस्था आहे. गावातील सर्व सामान्य शिधा पत्रिका धारकांना वेळेवर व शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य मिळावे, या अनुषंगाने मौजे- साकत येथे आपली संस्था शासनाच्या नियमाप्रमाणे व शासनाच्या अटीस अधिन राहुन स्वस्त धान्य दुकान चालविण्यास तयार आहे. याबाबत सर्व सदस्यांनी साधक बाधक चर्चा करुन दुकान चालविणे बाबत संमती दर्शविली व ठराव सर्वानमते मंजुर करण्यात आला. यावेळी साकत सेवा संस्थेचे चेअरमन कैलास वराट, सचिव दादा किसन मेंढकर तसेच सर्व संचालक उपस्थित होते.
यासाठी सुचक – श्री. पोपट आश्रू वराट तर
अनुमोदक श्री. महादेव जिजाबा वराट होते तसा
ठराव सर्वानुमते मंजुर
यामुळे साकतमध्ये सेवा संस्थेमार्फत नवीन स्वस्त धान्य दुकान होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.