जामखेड न्युज——
धक्कादायक बातमी!!!
विना रिफ्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने घेतला तीन तरुणांचा बळी परिसरात एकच हळहळ
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील तीन तरुणांचा काल दि.१३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील दौंड- पाटस रस्त्यावर गिरिम गावाजवळ (वायरलेस फाट्यानजीक) उसाच्या ट्रॅक्टरला मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात मृत्यू झा ला आहे.
ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ ), स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४), गणेश बापू शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून आज संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
सविस्तर माहिती अशी की मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून आपल्या घराकडे येत असताना उजव्या बाजूने समोरच्या वाहनाची प्रखर लाईट डोळ्यावर आली. त्यामुळे त्यांची मोटारसायकल डाव्या बाजूने पुढे असलेल्या विना रिफ्लेक्टर उसाच्या ट्रॅक्टरला धडकली आणि यामध्ये स्वप्निल,ऋषीकेश,व गणेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. दौंड आणि श्रीगोंदा पोलिस यांची गांभीर्याने दखल घेतात का हे आता पहावं लागेल.