जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षकांना कोरोना लसीचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक शिक्षक संघ जामखेड यांच्या वतीने आज जामखेड तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सर्व शिक्षक कोरोनाच्या विविध ड्युटीवर कार्यरत आहेत, त्यातच दुसरी लाट वेगाने पसरत आहे,त्यामुळे सर्व शिक्षक भीतीच्या सावटाखाली आपली ड्युटी पार पाडत आहेत. तरी येत्या काळात अजून कार्यक्षमतेने आणि निर्भिडपणे ड्युटीवर काम करण्यासाठी सर्व शिक्षकांना कोरोना लसीकरण तातडीने आणि प्राधान्याने देण्यात यावी अशी मागणी सदिच्छा मंडळ जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी केली.
यापूर्वीही शिक्षकांनी चेकपोस्ट, क्वारंटाईन सेंटर, स्वस्त धान्य वाटप, अत्यावश्यक सेवा भाजीपाला, दूध वाटप केलेले आहे, त्यामुळे शिक्षकांना प्राधान्याने लसीकरण करणे गरजेचे आहे, असे मत तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे आणि तालुकार्याध्यक्ष संतोष भोंडवे यांनी
तहसीलदार विशाल नाईकवाडे व नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचा प्राधान्याने विचार करून लसीकरण आवश्यक असल्याने लवकरात लवकर सर्व शिक्षकांना लसीकरण करण्याची ग्वाही दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे, तालुकार्याध्यक्ष संतोष भोंडवे, शिक्षक नेते अर्जुन घोलप, ज्ञानेश्वर कोळेकर, नितीन मोहळकर, जनार्दन आजबे व इतर शिक्षक उपस्थित होते.