जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
कोरोना रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करणार्या आरोळे कोविड सेंटर सध्या आर्थिक अडचणीत असल्याने परिसरातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश (दादा) यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीने आवाहन केले यानुसार १५१ पोते धान्य व भाजीपाल्याची भरघोस मदत आरोळे कोविड सेंटरला करण्यात आली.

महाराष्ट्र तसेच जगावर कोरोणा या विषाणूच्या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस खूप मोठे कोरोना पेशंट वाढत असून त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. या काळामध्ये डॉ. रवी आरोळे व डॉ. शोभा अरोळे हे
आरोळे कोविड सेंटरमधे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर औषधोपचारासह चहा नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करतात त्यांना एक छोटीशी मदत म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश (दादा) आजबे यांनी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना, युवकांना आवाहन केलं होतं की आपण दानशूरपणा दाखवून ज्यांच्याकडे धनधान्य आहे ज्यांच्याकडे भाजीपाला आहे त्यांनी तो स्वाभिमानी शेतकरी संपर्क कार्यालयात आणून द्यावा. त्या आव्हानाला प्रतिसाद देत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी पक्ष युवक कार्यकर्त्यांनी सर्वांचा एकत्रित 151 पोते धनधान्य व भाजीपाला एकत्रित करून आज डॉक्टर आरोळे यांना तो सुपूर्त करण्यात आला. त्याप्रसंगी डॉक्टर रविदादा आरोळे, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मााजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, प्रहार तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, सुलताना शेख, झिक्रीचे सरपंच दत्तात्रय साळुंके, युवक अध्यक्ष राहुल पवार, सरपंच बाळासाहेब ठाकरे, सोशल मीडिया अध्यक्ष कृष्णा डुचे, जामखेड शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, गणेश परकाळे दाजी, झिक्रीगावचे श्रीधर जिवडे, महादेव साळुंखे, सुभाष पवार, अविनाश पवार, भाऊसाहेब साळुंके, बाबासाहेब इथापे, इथापे सर, सचिन साळुंखे ,चंद्रकांत कसाब, रजनीकांत साळुंखेे, हरुण पठाण, चंद्रकांत साळुंखे रमेश इकडे, अकबर शेख. धोत्री येथील बाबू साळुंखे, विकास अडाले, पिंपळवाडी येथील प्रकाश घोलप, दादासाहेब मोहिते, शिवनाथ घोलप, सुनील घोलप, किशोर घोलप, जितेंद्र घोलप, संदीप नेमाने, पाडळी येथील बुवासाहेब दहीकर, सोमनाथ पवार, तात्या वाघमारे, नितीन गोसावी, अभिजित पवार, बाबू डुचे, पाटोदा येथील राजेंद्र कवादे, बिबीशन कवादे, पंढरी शिखारे, सचिन गव्हाणे, खंडू कवादे, दत्ता शितोळे, धनंजय काळाने, जामखेड येथील राजू सरडे, गणेश खेत्रे, भारत औटी, खुरदैठण येथील, अंकुश सांगळे ,मोहन मदने, सेवक डुचे,सचिन डुचे, कृष्णा प्रकाश डुचे,पोपट सांगळे ,भीमराव डुचे .सारोळा येथील बंडू मुळे, मंगेश मुळे, किरण काळे, बंडा डुचे, विशाल ढोले योगेश मुळे, देविदास पवार, अजय अजबे, संभाजी खैरे, विठ्ठल पवार, सतीश मुळे .भुतवडा येथील. लक्ष्मण डोके, केशव डोके, सागर राळेभात, नामदेव डोंगरे, आप्पा मोरे, अवी मोरे, ऋषिकेश डोके, दादा टेकाळे इत्यादी शेतकरी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंगेश दादा आजबे यांनी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले व संघटनेतील सर्व युवक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले तसेच येणाऱ्या काळात कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांचा आदर्श घेत पावलावर पाऊल ठेवत खांद्याला खांदा लावून समाज सेवा करत राहणार व डॉक्टर रविदादा आरोळे यांना मदत करत राहणार असे जाहीर केले.त्याच बरोबर जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी येणाऱ्या काळात सर्वांनी राज्यशासनाची बंधने व नियम पाळावेत असे आवाहन केले. तसेच प्रहार संघटना तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनी मंगेश दादा आजबे यांचे कौतुक करून त्यांना खंबीर साथ देणार असे आश्वासन देऊन सर्व शेतकऱ्यांचे व युवक कार्यकर्त्यांचे आभार मानले. डॉक्टर रवीदादा आरोळे यांनी आरोळे हॉस्पिटलला सर्व दानशूरांनी मदत करावी असे आवाहन केले.