गावकी – भावकीचे राजकारण तापले राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला तालुक्यातील राजुरी, शिऊर व रत्नापूरचे वातावरण तापले

0
193

जामखेड न्युज——

गावकी – भावकीचे राजकारण तापले
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला तालुक्यातील राजुरी, शिऊर व रत्नापूरचे वातावरण तापले

माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या (ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नगर जिल्ह्यातील २०३ तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणूकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून गावकी – भावकीच्या राजकारणाला वेग येणार आहे.
जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे
राजुरी,
शिऊर,
रत्नापूर या ग्रामपंचायती आहेत.

तालुक्यातील शिऊर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, रत्नापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता वारे तसेच जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे तर राजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ग्रामपंचायती वर वर्चस्वसाठी आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे सरसावले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे रद्द झालेल्या आरक्षणावरची सुनावणी आणि पावसाळ्यात पावसामुळे निवडणूक प्रक्रीयेत येण्याची निर्माण झालेली शक्यता यांमुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज, बुधवारी मुंबईत केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.

आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी निवडणूकीची घोषणा करताना सांगितले की, ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्दे शनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.

 

असा आहे निवडणूक कार्यक्रम..२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर – उमेदवारी अर्ज दाखल कालावधी ०५ डिसेंबर – उमेदवारी अर्ज छाननी ७ डिसेंबर – उमेदवारी अर्ज माघारी अखेर दिवस व चिन्ह वाटप १८ डिसेंबर – मतदान २० डिसेंबर मतमोजणी

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे
राजुरी,
शिऊर,
रत्नापूर

जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या अकोले-११, जामखेड – ३, कर्जत – ८, कोपरगाव २६, नगर – २७, नेवासा – १३, पारनेर – १६, पाथर्डी – ११,संगमनेर-३७,राहाता ११, संगमनेर – ३७, राहाता – १२, शेवगाव – १२ श्रीरामपूर – ६, राहुरी – ११, श्रीगोंदा – १०

राज्यातील जिल्हानिहाय संख्या..अहमदनगर- २०३, अकोला २६६, अमरावती – २५७, औरंगाबाद – २१९, बीड – ७०४, भंडारा – ३६३, बुलडाणा – २७९, चंद्रपूर- ५९ धुळे – १२८ गडचिरोली- २७, गोंदिया – ३४८, हिंगोली – ६२, जळगाव १४०, जालना -२६६, कोल्हापूर – ४७५, लातूर- ३५१, नागपूर – २३७, नंदुरबार १२३, उस्मानाबाद १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे – २२१, रायगड- २४०, रत्नागिरी – २२२, सांगली – ४५२, सातारा – ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा – ११३, वाशीम – २८७, यवतमाळ १००, नांदेड- १८१ व नाशिक १९६

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here