जामखेड न्युज—-
बेशिस्त वाहनधारकांना आता कोर्टात जाऊनच आपले वाहन सोडवावे लागणार
नियमबाह्य वाहनचालकांकडून जामखेड पोलीसांनी दहा महिन्यात वसुल केला तेवीस लाखांचा दंड
नियमांचा भंग करणाऱ्या ट्रिपल सिट, नो पार्किंग मध्ये पार्किंग, वेगाची मर्यादा ओलांडणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, अवैध प्रवाशी वाहतूक , विना परवाना अशा प्रकारे नियमबाह्य वाहनचालकांकडून जामखेड पोलीसांनी दहा महिन्यात तेवीस लाखांचा दंड वसूल केला आहे. तसेच आता बेशिस्त वाहनधारकांना आता कोर्टात जाऊनच आपले वाहन सोडवावे लागणार आहे.
जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे इनचार्ज पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल आजीनाथ जाधव व दिनेश गंगे यांनी शहरातील वाहतूक नियंत्रण करताना नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर विविध प्रकारच्या कारवाया करत यावर्षी जानेवारी २०२२ ते आँक्टोबर २०२२ अखेर तब्बल २३ लाख ०८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
तरीही वाहनचालकांचा बेशिस्तपणा कमी होत नसल्याने आता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नियमभंग करणाऱ्यांवर आता वाहतूकीस अडथळा ठरेल अशा पध्दतीने रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या वाहन चालकांवर भा.द.वी. २८३ नुसार गुन्हा दाखल करून तो कोर्टात पाठवण्यात येणार आहे. यामुळे बेशिस्त वाहनधारकांना कोर्टात जाऊनच आपले वाहन सोडवावे लागणार आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१८ पासून पोलीस पोलीस काॅन्स्टेबल आजीनाथ जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये सन २०१८ पासून वाहतूकीस अडथळा करणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करत जामखेड शहरातील ट्रॅफिकला शिस्त लावण्याची कामगिरी केली आहे. दंडात्मक कारवाई करताना सन २०१८ केसेस ११०६ दंड २ लाख ४५ हजर ८०० रुपये,
सन २०१९ केसेस ७०६, १ लाख ५२ हजार ४०० रूपये,
२०२१ मध्ये केसेस १२९३, २ लाख ९६ हजार ५०० रूपये.
तर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यानंतर कोरोना काळ सुरू होता याकाळात विनामास्क, सोशल डिस्टेन्स, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कोरोना काळात डबलशिट बंदी असताना डबलशिट जाणारे मोटारसायकल स्वार व बेशिस्त वाहन धारकांवर आँनलाईन म्हणजेच ई मशीनव्दारे तब्बल ११०२५ केसेसच्या माध्यमातून ३३ लाख ६३ हजार ७३३ रूपयांचा वसूल केलेला विक्रमी दंड वसूल केलेला आहे.
यावर्षीही जामखेड वाहतूक शाखेकडून जानेवारी २०२२ ते आँक्टोबर २०२२ या दहा महिन्याच्या कालावधीत तब्बल २३ लाख ०८ हजार ५०० रूपयांचा मोठा दंड वसूल केला आहे.
यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारी वाहने कोर्ट केसेस ३८ दंड ५६००,
अवैद्य प्रवाशी वाहतूक ६ केसेस १३,३०० रुपये दंड,
दारू पिऊन वाहन चालवणे १२ केसेस १६,९०० दंड,
ऑनलाईन ३९६५ केसेस २३,०८,५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अतीवेगाने वहाने चालवणे ६ केसेस अशा केसेस नव्याने केसेस करण्यात आल्या असून या केसेस न्यायालयात पाठवण्यात येणार आहेत.
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना शिस्त लावण्याबरोरच दंडाची मोठी रक्कम वसूल करून शासनाला मोठा महसूल महसूल मिळवून देण्याचे कामही जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेकडून केले जात आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा इनचार्ज पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच, होमगार्ड रफिक तांबोळी व हरिष पवार यांचेही याकामी मोलाचे सहकार्य असते अशी माहिती वाहतूक शाखेचे इनचार्ज अजीनाथ जाधव यांनी दिली आहे.
या कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पोलीस स्टेशनच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.