जामखेड न्यूज—-
गावकारभाऱ्यांनो तयारीला लागा
ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदाची निवडणूक १८ डिसेंबर रोजी
७७५१ ग्रामपंचायती जामखेड मधील तीन ग्रामपंचायती
माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायती निवडणूक आहे तर जामखेड मधील तीन ग्रामपंचायती आहेत शिऊर, राजुरी व रत्नापूर या तीन ग्रामपंचायती आहेत.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द
करण्याचा दिनांक १८ नोव्हेंबर रोजी
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा
दिनांक व वेळ ( नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या
ठिकाणी) २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ पर्यंत
नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ
(नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) ५ डिसेंबर २०२२
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व
वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी )
७ डिसेंबर २०२२पर्यंत
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच
अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची
यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ
७ डिसेंबर २०२२ दुपारी तीन नंतर
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
१८ डिसेंबर २०२२रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत.
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक
(मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या
मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार
राहील) २० डिसेंबर रोजी
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या
निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम
दिनांक मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम होईल