Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या अभ्यासात सातत्त्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड स्वामी विवेकानंद...

अभ्यासात सातत्त्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन संपन्न

0
308

जामखेड न्यूज—–

अभ्यासात सातत्त्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते- पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन संपन्न

स्वतःशी व आई-वडिलांचे प्रामाणिक राहा

सकारात्मक विचार केला तर चांगले परिणाम होतात.

चांगली पुस्तकं आपली चांगली मित्र असतात.
पो नि संभाजी गायकवाड

 

विद्यार्थ्यांनी कमी मार्क पडले म्हणून कोणी जीवनात अपयशी होत नाही आपण सकारात्मक विचार केला तर आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक बदल होतात व समाजामधील नकारात्मक बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. स्वतःला कधीच कमी समजू नका प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका व स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. 

अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते. स्वतःची निर्णय क्षमता वाढवा व संयम बाळगा. स्वतःशी व आई-वडिलांशी प्रामाणिक राहा आवडीचे काम निवडा तर ते तुम्हाला काम वाटणार नाही, चांगली पुस्तकं आपली चांगली मित्र असतात.

मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, असे मार्गदर्शन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना केले.

 

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख उपस्थिती जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड एनसीसी प्रमुख मयूर भोसले स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक सोमनाथ शिंदे, शिंदे बी एस, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे पत्रकार यासीन शेख, पप्पू भाई सय्यद, धनराज पवार, संभाजी गायवळ सर व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरवात करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली, व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्नावर चर्चा केली.

मनावर ताण तणाव न घेता अभ्यास करावा. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वानुसार अभ्यासाची पद्धत बदलत असते त्यामुळे स्वतःच्या अभ्यास करण्याची पद्धत तयार करा. स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिकेचे नियोजन व उपक्रम चांगले आहेत नक्कीच या मधील अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून आम्हास पाहावयास मिळतील. असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे बी एस सर यांनी केले तर सूत्रसंचलन भाऊसाहेब देवकर व आभार केतन भालेराव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!