Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या गायकवाड परिवाराने केले स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने भव्य स्वागत

गायकवाड परिवाराने केले स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने भव्य स्वागत

0
348

जामखेड न्युज——

गायकवाड परिवाराने केले स्त्री जन्माचे भव्य स्वागत

आदर्श शिक्षक, बौद्धाचार्य मा संचालक अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ आयु गोकुळ गायकवाड व मीनाक्षी गायकवाडा यांचा मुलगा अक्षयकुमारआणि सुन प्रणाली यांना दि 29/10/2022 रोजी प्रथम कन्यारत्न झाले. 

आज दि 3/11/2022 रोजी सायंकाळी 6:00 वा नालंदा निवास , दत्तनगर बीड रोड जामखेड येथे राजमाता जिजाऊ,  आहिल्याबाई होळकर ,सावित्रीबाई फुले, फातीमा शेख, भिमाई , रमाई यांचा वारसा जपणा-या गायकवाड परिवाराने आज आपल्या लाडक्या नातिचे भव्य असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले याबद्दल गायकवाड परिवाराचे स्वागत होत आहे. 

नातीचे स्वागत करण्यासाठी गायकवाड परिवाराने घराची सुंदर पद्धतीने सजावट केली होती. सुंदर फुले ,फुगे ,तोरणे रांगोळी, प-याचे कट आऊट ,बुध्द मूर्ती, जिजाऊ ,आहिल्याबाई, सावित्रीबाई ,फातिमा, भिमाई रमाई यांचे फोटो लावून आरास करून फटाके फोडून अतिशय उत्साहाने , टाळ्या वाजवून, महिलांनी औक्षण करून भव्य असे स्वागत केले. 

गायकवाड कुटूंबात आईचा पत्नीचा सुनेचा सन्मान केला जात आहे व आता नातीचे अतिशय सन्मानाने स्वागत केले आहे.

 

पणजीने पणतीचे लाडात स्वागत केले,
आजच्या स्वागत सोहळ्यात शाहिर बाबासाहेब राजगुरु, सुरेखाताई सदाफुले ,सुरेखाताई र सदाफुले, सतिष सदाफुले, रमेश सदाफुले , अनिल सदाफुले, रत्नाकर सदाफुले, संभाजी आव्हाड, शेखर घायतडक आणि परिवार, अभिमान घोडेस्वार आणि परिवार ,संदेश घायतडक, राळेभात ताई , राऊत, ताई, सुरवसे ताई, एकनाथ चव्हाण सर , बाळु जरांडे सर ,मुकुंद सातपुते सर , केशव हराळे सर , अशोक साळवे, शुभम साळवे, सह बाळाची पणजी निलावती गायकवाड ,आजी मीनाक्षी गायकवाड व माया साळवे, आत्या ज्योती घायतडक, स्वाती घोडेस्वार, किलबिल भूमी, सोनल माऊ अवनी , अदित्य , चिकू सहभागी होऊन लाडक्या कन्यारत्नाचे स्वागत केले आहे. 

गायकवाड परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे या परिवाराने स्त्री जातीचा सन्मान करण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे . स्वागत सोहळ्यात सर्वांना मिठाई वाटप करून सर्वांचे तोंड गोड केले ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!