जामखेड न्युज——
४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नगरचे नवे एसपी राकेश ओला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या जागी राकेश ओला आले आहेत.
राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांची आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास नियुक्ती करण्यात आली.
नगरचे सध्याचे पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांच्या जागेवर लवकरच राकेश ओला हे रुजू होतील.
आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर श्री.राकेश ओला यांची सर्वप्रथम प्रशिक्षणार्थी IPS म्हणून श्रीरामपूर येथे 2015 – 2016 या काळात नियुक्ती करण्यात आली होती.
तो काळ देखील राकेश ओला यांनी धडक कारवाईने गाजवला होता.
मालेगाव येथे राकेश ओला यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावलेले आहे.