जामखेड न्युज——
येडेश्वर नागरगोजे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
जामखेड तालुक्यातील मोहा येथील प्रदिपकुमार महादेव बांगर विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अध्यापक येडेश्वर नागरगोजे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
येडेश्वर कल्याण नागरगोजे सर..” शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक “पुरष्काराने सन्मानित. १६ आँक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे उपजिल्हाधिकारी जि. प.मुख्यकार्यकारी अधिकारी, एस पी.शिक्षण अधिकारी कुलकर्णी साहेब, सारुक साहेब,कराड साहेब,धस मॅडम,ससाणे मॅडम,सत्यभामाताई बांगर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोहा येथील प्रदीपकुमार महादेव बांगर विध्यालयाचे इंग्रजी विषयाचे उपक्रमशील शिक्षक येडेश्वर नागरगोजे सर यांना मैत्रा फौंडेशनचे अध्यक्ष द. ल.वारे,राठोड सर ,किरण देशपांडे अनेक तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांनी सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विविध उल्लेखनीय उपक्रमाचा सामाजिक कार्याचा सेवाभावी वृत्तीचा विचार करून त्यांच्या कार्याचा पुरष्कार देऊन सन्मान केला आहे.
तसेच समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांकडून सरांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वागीण विकासासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.