संतसहवासाचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही – हभप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे  वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

जामखेड प्रतिनिधी

             जामखेड न्युज——

संतसहवासाचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही – हभप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे  वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा ह. भ. प.न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे वाघदरा बीड यांची कीर्तन सेवा झाली 
  त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले. 

आलिंगनें घडे ।
मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा ।
जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
तीर्थे पर्वकाळ ।
अवघीं पायांपें सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा ।
त्यांची केली पावे सेवा ॥३॥

अर्थ
संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते .अशा संतसहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात .संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात .तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संतचरणांची सेवा करावी .

  कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे,
बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, 
 हभप हरीभाऊ काळे, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 
       सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.  
शनिवार दि. १५ रोजी महेश महाराज माकणीकर लोहारा
रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 
      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!