जामखेड न्युज——
शहरातील अतिक्रमणाबाबत समझोत्याने मार्ग काढू
आमदार रोहित पवारदीपावली पर्यंत जैसे थे!! नंतर अधिकारी व व्यापारी बैठक होणार
श्रीगोंदा ते बीड सरहद्द १३.४ किलोमीटर रस्ता जामखेड शहरातून जात आहे सध्या मोजणीचे काम सुरू आहे शहरात शंभर फुट तर शहराबाहेर नव्वद फुट रस्ता होत आहे. शहरातील अनेकांच्या दुकानांवर यामुळे हातोडा पडत आहे. यामुळे व्यापारी वर्गात घबराट आहे. आता आपले कसे होणार व्यापारी वर्गाला धीर देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र बैठक बोलावली होती यात त्यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणाबाबत समझोत्याने मार्ग काढू तसेच दीपावली पर्यंत जैसे थे!! राहिल दिपावली नंतर नंतर अधिकारी व त्यांच्या बांधकामावर हातोडा पडत आहे अशा व्यापाऱ्यांबरोबर स्वतंत्र बैठक घेऊ.
कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून, श्रीगोंदा ते बीड सरहद एन् एच् ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गाचे १३.३९ किमी लांबीचे, मोजणीचे काम चालू झाले आहे, सदर मार्ग हा जामखेड शहरांमधून जात आहे, त्यामुळे काही प्रमाणात इमारती बाधित होणार आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती, या संदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन, जामखेड शहराच्या मधून जाणारा एन् एच् ५४८ डी रस्ता अधिकारी व त्या बाजूला असलेले अतिक्रमण धारक्यांच्या समवेत, विद्यमान आमदार यांनी स्थानिक व्यपाऱ्यांची, आमदार कार्यालयात मिटिंग बोलावली होती.
यावेळी आ.रोहित पवारांनी पंचदेवालय
बाफना मंदीर ते बस डेपो बस डेपो ते खर्डा चौक,
खर्डा चौक ते बीड रोड कॉर्नर बीड रोड कॉर्नर व शेवटी शासकीय दूध केंद्र या दरम्यानच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांशी चर्चा केली, व त्यांच्यावर कमीत- कमी अडचणी येईल ; अशी ग्वाही दिली,
रस्ता होणार चौपदरी – रस्त्याच्या मध्यभागी स्ट्रीट लाईट व दुतर्फा नाल्या, सुशोभीकरण खर्डा चौकात छत्रपतींचा पुतळा उभारायचे उद्दिष्ट असून बीड कॉर्नर परिसरात जैन स्तंभ उभा करण्याची इच्छा आमदार पवारांनी व्यक्त केली.
दिवाळी नंतर निर्णय
दिवाळी पर्यंत रस्त्याच्या संदर्भातील अधिकारी वर्गाने मोजणी करून घ्यावी व दिवाळी नंतरच्या मिटिंग मध्ये ज्यांच्या बांधकामावर गदा येणार आहे ; अशा व्यापाऱ्यांना व अधिकाऱ्यांना घेऊन स्वतंत्र बैठक घेण्याचे सुचवले.रस्ता, अतिक्रमण तसेच आदी अडचणी बाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आमदार रोहित पवार व संबंधित अधिकार्यांना अडचणी बोलवून दाखवल्या.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,जेष्ठ नेते मधुकर राळेभात, सुरेश भोसले,तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे,सूर्यकांत मोरे, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, वैजनाथ पोले, काँग्रेसचे राहुल उगले, उद्योजक रमेश आजबे,उमर कुरेशी, नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव,शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रविण उगले,महेश राळेभात, सचिन शिंदे,अमित गंभीर, आनंद गुगळे, मोबाईल असोसिएशनचे सुनिल जगताप, अशोक पितळे ,सतीश पितळे ,प्रकाश पितळे, मेडिकल असोसिएशनचे मा. अध्यक्ष सुभाष भळगट, नासीर भाई शेख, चंद्रकांत ढाळे, मोहन ढाळे,अभय शिंगवी,शरद शिंगवी,अशोक गिरमे,विनायक राऊत,अजय कोठारी ,प्रविण बाफना,गौतम बाफना,कुंडल राळेभात,महावीर बाफना,तसेच इतर प्रतिष्ठीत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.