जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी वाढदिवसानिमित्त नगरपरिषद हद्दीत आमदार रोहित पवारांच्या हस्ते वाटले सुंगधी उटणे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे आपल्या समाजसेवेबद्दल प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत पदरमोड करत अनेक सामाजिक कार्ये केलेली आहेत यामुळे लोकांना खूपच फायदा झाला आहे. अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शहरात स्वच्छता अभियान लोकचळवळ बनवली नवरात्र उत्सवामध्ये शेकडो महिलांना पदरमोड करत मोहटादेवीची मात्रा घडविली. आणी आता वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवारांच्या हस्ते नगरपरिषद हद्दीतील कुटुंबांना आयुर्वेदिक सुंगधी उटणे वाटप केले आहे.
कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते जामखेड नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक घराला आयुर्वेदिक सुगंधी उटणे वाटप करण्याचे आहे त्याचे वितरण करण्यात आले व रमेश दादा आजबे यांचा वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा.
मधुकर राळेभात, सूर्यकांत नाना मोरे, वैजनाथ पोले, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, आजबे काका, प्रवीण उगले, दादासाहेब ढवळे, चंद्रकांत आजबे, घनश्याम अडाले, पिंटू इंगोले, सचिन खैरे,राजेंद्र आजबे, प्रमोद पोकळे, मनोज डाडर, तात्या कदम, गणेश कार्ले,अमोल कार्ले, शहाजी गाडे इत्यादी मान्यवर व सावळेश्वर शोरूम स्टाफ उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आतापर्यंत जामखेड शहरासह झिक्री, या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वतः ला झोकुन देत परिसरातील नागरिकांना एकत्र करून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला आहे.
नवरात्र उत्सवामध्ये शेकडो महिलांना पदरमोड करत मोहटादेवीची मात्रा घडविली.
रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श केले बिनविरोध निवडणूका, मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक, बंदिस्त गटारे, लाईट ची कामे, आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले, ग्रामीण रूग्णालयात बोअरवेल घेतल्याने व मोटार बसविल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली. शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे लावली झाडांना टॅंकरने पाणी घातले व संरक्षक जाळी बसवली त्यामुळे हरित जामखेड होऊ लागले आहे.
त्यांनी लावलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झाडांचे आळे साफसफाई करत टॅकरद्वारे पाणी घातले. या सर्व उपक्रमामुळे थोड्याच दिवसांत स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड उदयास येत आहे.