जामखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार पीके पाण्यात, दरडवाडीत वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू

0
228

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार
पीके पाण्यात, दरडवाडीत वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू

गेल्या पाच दिवसांपासून परिसरात दररोज मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार पसरला आहे. नद्यांना दररोजच पुर येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पुल वाहून गेले आहेत. पीके पाण्यात आहेत पीके सडून चालली आहेत. आज जामखेड तालुक्यातील दरडवाडी या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या एका बैलावर वीज पडुन त्याचा जागीच मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून जामखेड परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने आनेक नद्यांना पुर आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यात मागील दोन दिवसापासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे आहे. त्यामुळे नदी व नाल्‍यांना मोठ्या प्रमाणात पुर आले आहेत. आज शुक्रवार दि १४ रोजी जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील केकान वस्ती परीसरात शेतकरी बाबुराव अर्जुन केकाण हे आपली गुरे चारत होते. यावेळी त्यांचा एक बैल चरत असताना यावेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.

त्यामुळे सदर बैल जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबला आसताना दुपारी अचानक त्या बैलाच्या अंगावर वीज पडली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर ची घटना गावातील ग्रामस्थ बाबुराव अर्जुन केकाण यांनी आ. प्रा राम शिंदे यांना सांगितली या नंतर तातडीने सदरची माहिती आ. प्रा राम शिंदे यांनी प्रशासनास कळवली होती.

यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संजय राठोड यांना घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी एस एस सुरवसे व पाचरणे यांना सोबत घेऊन घटनास्थळी बैलाचे शवविच्छेदन केले या मध्ये सदर बैलाच्या अंगावर वीज पडुन मृत्यू झाला आसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मृत्यू झालेल्या बैलाच्या मालकास आपत्ती जनक मध्ये शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

खर्डा शहराजवळील नदीला आला पुर

खर्डा व परिसरात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे शहरालगत व नागोबाचीवाडी व मुंगेवाडी कडे जाणाऱ्या नदीला देखील आज पूर आला होता .त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.ही नदी बेलेश्वर मंदिर रोडवर असून नदीच्या पुरामुळे नागोबाचीवाडी व मुंगेवाडी व पखरूड कडे जाणारी व येणारी वाहने काही तास ठप्प झाली होती.
साकत परिसरातील सोयाबीन पीके पाण्यात आहेत दररोज पाऊस पडत असल्याने पीके सडून चालली आहेत. पिकांचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here