जामखेड न्युज——
जिल्हा परिषदेच्या शाळेतच उत्तम विद्यार्थी घडतात- डॉ. भगवानराव मुरूमकर
खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिक्षक हे उत्तम विद्यार्थी घडतात असे पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेमुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांमध्ये मोठे गुण अवगत होत आहेत त्यासाठी चित्रकला स्पर्धा सारख्या अनेक स्पर्धा घेण्यात याव्यात असे यावेळी मुरूमकर म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशीद होते, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा, जामखेडचे नगरसेवक अमित चिंतामणी, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, सौ.कांचन गणेश शिंदे, मदन पाटील, राजू मोरे, माजी सरपंच राम भोसले, भाजप नेते बाजीराव गोपाळघरे, कांतीलाल डोके, नानासाहेब गोपाळघरे, पिल्लू पंजाबी, बाळासाहेब गोपाळघरे, गणेश लटके शरद शिंदे, खलील आतार, सलमान आतार,दादा मोरे, किरण जाधव भारत होडशिल इ.उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा नेते श्री वैजीनाथ पाटील व ग्रामपंचायत सदस्यां सौ. संजीवनी पाटील यांचे वतीने दि 23 सप्टेंबर 2022 रोजी जि. प.प्रा. शाळा खर्डा मुले, मुली व उर्दू येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, स्पर्धेचा विषय “जल हि जीवन है” ठेवण्यात आला होता.
या स्पर्धेत 468 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला,या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण आज शाळेत करण्यात आले, यावेळी सर्व वर्गातून प्रथम विद्यार्थ्यास सन्मानपत्र व ट्रॉफी बक्षीस देण्यात आली व सहभागी सर्व विद्यार्थ्याना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले
प्रथम विद्यार्थी खालीलप्रमाणे
खर्डा मुले
अभिराज सचिन मोहळकर इ1अर्णव अमोल वडे,शुभम भाउसाहेब ढेरे, अजिंक्य अनिल गोलेकर,नयन जितेंद्र जावळे,आयुष् दत्तात्रय खोबरे,शंभराजे राम क्षीरसागर,साहिल लक्षमन शिंदे
उर्दू शाळाजैद अल्लाउद्दीन सय्यद, रीजैनांब फिरोज आतार,खर्डा मुली,अन्विता सचिन मोहळकर, मीनाक्षी भगतशिंग सुनार,जान्हवी लखन पैठणपगार,हिंदवी चंद्रकांत अरण्ये,श्रावणी घनश्याम भोसले,स्वराली वैभव कुक्कडवाड,धनश्री श्रीकांत लाड, वैष्णवी गणेश धोकटे या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुका उपाध्यक्ष वैजीनाथ पाटील यांनी केले, सूत्रसंचालन मुख्याध्यापक राम निकम यांनी केले तर आभार सौ. संजीवनी पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.