“तुमच्यासाठी काय पण” आज लावणीचा सदाबहार कार्यक्रम कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन -प्रा.सचिन गायवळ

0
319

जामखेड न्युज——

“तुमच्यासाठी काय पण” आज लावणीचा सदाबहार कार्यक्रम

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन -प्रा.सचिन गायवळ

सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा.सचिन गायवळ यांच्या संकल्पनेतून खर्डा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त “तुमच्यासाठी काय पण” हा सदाबहार लावण्यांचा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा. सचिन गायवळ यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दि. ३ ऑक्टोबर रोजी खर्डा बसस्थानक परिसरात रोजी रात्री ९ :०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्र नावाजलेला तुमच्यासाठी काय पण हा कार्यक्रम खास खर्डा व परिसरातील जनतेसाठी हा सदाबहार लावण्यांचा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव प्रा. सचिन गायवळ यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सरांनी आतापर्यंत पदरमोड करत अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली आहेत. रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, शाळांना मदत, वृक्षारोपण, गोरगरिबांना मदत तसेच अनेक भांडणे समजोता करत गावातच मिटवली आहेत त्यामुळे गायवळ सरांविषयी जनतेच्या मनात प्रचंड प्रेम जिव्हाळा आहे. नेता कसा असावा याचा सुंदर परिपाक म्हणजे गायवळ सर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here