Wednesday, September 30, 2026
Home ताज्या बातम्या पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांचा खरीप करपला! जमादारवाडीत पंचनाम्यांना सुरुवात भाजपा शहरमंडलाध्यक्ष...

पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांचा खरीप करपला! जमादारवाडीत पंचनाम्यांना सुरुवात भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

0
2
पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांचा खरीप करपला! जमादारवाडीत पंचनाम्यांना सुरुवात  भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

पावसाने दगा दिला, शेतकऱ्यांचा खरीप करपला! जमादारवाडीत पंचनाम्यांना सुरुवात

भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी

जामखेड परिसरात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून काही शेतांमध्ये पिके अक्षरशः करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय (काका) काशिद यांच्या पाठपुराव्याने जमादारवाडी येथे नुकसानग्रस्त पिकांची संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पिकांची पाहणी केली आणि नुकसानीची नोंद केली.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी वैजिनाथ वसंत मिसाळ, सहाय्यक कृषी अधिकारी राणी भास्कर चव्हाण यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनाम्याची कार्यवाही केली. यावेळी संबंधित शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जमादारवाडी परिसरात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांना आवश्यक ओलावा मिळाला नाही. परिणामी पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये पिके सुकून गेली आहेत. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

पंचनामे केवळ कागदावर न राहता त्याआधारे पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पावसाअभावी खरीप हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया अधिक गतिमान करावी आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या पाहणी व पंचनामा प्रक्रियेदरम्यान संजय काका काशिद, पत्रकार अशोक वीर, उद्धव अजबे, अनिल नेटके, दादा महाराज आजबे, अमोल अजबे, विठ्ठल अजबे, कदम मेजर, भैय्या गांगर्डे, खोटे दाजी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनामे पूर्ण करून शासनाकडून नुकसानभरपाई लवकर मिळणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!