जामखेड न्युज——
तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जामखेड व खर्डा शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत
दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जामखेड व खर्डा पोलिसांचा चोख बंदोबस्त सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या हस्ते आरती!!!
दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर या वर्षी तुळजाभवानी मातेच्या पलंग आला असताना जामखेड व खर्डा शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोन्ही ठिकाणी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आगोदरच नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी काय खबरदारी घ्यावी असे सोशल मीडियातून आवाहन केले होते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता साडेतीन शक्तीपीठा पैकी एक प्रमुख शक्तीपीठ समजले जाते. जामखेडला दुपारी व खर्डा येथे सातव्या माळेला संध्याकाळी सहा वाजता पलंगाचे सालाबाद प्रमाणे खर्डा शहरात आगमन झाले, तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) येथून निघालेला पलंग तुळजापूरला जामखेड व खर्डा मार्गाने जात असतो.
देवीच्या पलंगाचे जामखेड शहरात विविध ठिकाणी तसेच खर्डा शहरातील मांढरदेवी नवरात्र उत्सव येथे आरतीचा कार्यक्रम करून नंतर चौंडेश्वरी देवी मंदिराच्या समोर सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
तसेच इतर देवीच्या ठिकाणी पूजन करून खडकपुरा गल्ली येथील तुळजाभवानी मंदिराच्या पटांगणात पलंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची मोठी झुंबड उडाली होती. गावात अनेक ठिकाणी आराधी गाणे व देवीच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला होता, आई राजा उदो उदो म्हणत भक्तीचा महासागर दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी करीत होता, त्यानंतर तुळजाभवानी मातेचा पलंग तुळजापूर कडे रवाना झाला, त्यावेळी भाविकांनी पलंगाला मनोभावें निरोप दिला.
या तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के,पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल खाडे इत्यादी सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.