जामखेड न्युज——
एकलव्य करीअर अकॅडमीतील नऊ विद्यार्थी शासकीय नौकरीत
जामखेड येथील एकलव्य करिअर अकॅडमी व अभ्यासिका मधील नऊ विद्यार्थी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने घेतल्या गेलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन नौकरीला लागले आहेत. त्यामुळे एकलव्य अकॅडमी ग्रामीण भागासाठी वरदान ठरली आहे.
एकलव्य अकॅडमीतील विद्यार्थी भरत कुमटकर (सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड) हा मुंबई शहर पोलिसांत भरती झाला होता त्याचा सत्कार बाजार समितीचे माजी संचालक पोपट राळेभात, युवक नेते गोरख धनवट, डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष (पशुवैद्यकीय) डॉ. विठ्ठल राळेभात, अकॅडमीचे संचालक अशोक पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोपट राळेभात म्हणाले, जामखेड सारख्या दुष्काळी भागात पदवीधर विद्यार्थी अभ्यासासाठी पुणे, मुंबई शहरात जावे लागते.
एकलव्य अकॅडमीचे अशोक पंडित यांनी ही बाब ओळखून जामखेड येथे अभ्यासिका उपलब्ध करून युपीएससी व एमपीएससी अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांची लॅबरी उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचवला त्यामुळे या अकॅडमीतील नऊ विद्यार्थी केंद्र व राज्य शासनाच्या नौकरीत समाविष्ट झाले या सर्वांना शुभेच्छा राळेभात यांनी दिल्या.
एकलव्य करीअर अकॅडमीचे संचालक अशोक पंडित यांनी अकॅडमीबाबत माहीती देऊन या संस्थेतील विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतलेल्या परिक्षेत सौताडा येथील दादा टेकाळे, सागर पेचे, दादा तांबे, चिंचपुर (ता. आष्टी जि. बीड) येथील महिंद्र सातपुते, सागर घोडके हरिनारायण आष्टा उत्तीर्ण होऊन नौकरीत लागले तर महाराष्ट्र पोलीस दलात जामखेड तालुक्यातील हापटेवाडी येथील नितीन डोंगरे पोलीस उपनिरीक्षक तर पोलीस म्हणून लखन कुमटकर (सौताडा), तुषार टेकाळे पुणे शहर (सौताडा), खंडू शिंदे मुंबई शहर (सौताडा), भरत कुमटकर मुंबई शहर (सौताडा), राहुल बनाते (शिऊर ता. जामखेड), सादिक चाऊस (नान्नज), संतोष वारे (रत्नापूर), आयुब पठाण (रत्नापुर), प्रदीप शिंदे (फक्राबाद),
ॲक्सिस बँकेत राहुल गळगटे, (आष्टा हरिनारायण), प्रकाश पठाडे (आष्टा हरिनारायण) हे सर्वजण एकलव्य मधील विद्यार्थी नौकरीला आहेत. हरीनारायण आष्टा येथील ग्रामविकास अधिकारी धोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.