आमदार प्रा. राम शिंदे यांची खर्डा पोलीस स्टेशनला भेट, पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सत्कार

0
200

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांची खर्डा पोलीस स्टेशनला भेट, पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा सत्कार

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे कोणत्याही उत्सवापेक्षा शारदीय नवरात्र उत्सवाला मोठे महत्त्व दिले जाते. या उत्सवाच्या अनुषंगाने काल दि. १ ऑक्टोबर रोजी आ. प्रा. राम शिंदेनी खर्डा पंचक्रोशीतील विविध नवरात्र मंडळांना भेटी देऊन देवींचे दर्शन घेत आरत्याही केल्या. या दरम्यान आ. प्रा. राम शिंदे यांनी खर्डा येथे नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित झाल्याबद्दल पोलीस स्टेशनला भेट दिली. व चाललेल्या कामकाजाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेतला.

यावेळी खर्डा येथे नवीन पोलीस स्टेशन झाल्यानंतर आ. शिंदेंनी पहिल्यांदाच पोलीस स्टेशनला भेट दिल्याबद्दल पोलीस स्टेशनच्यावतीने येथील अधिकारी सहाय्यक पोलीस निरक्षक प्रकाश पाटील यांनी त्यांचा सत्कार व स्वागत केले.

यावेळी भाजपाचे कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, बाजीराव गोपाळघरे, नितीन सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, वैजनाथ पाटील, गणेश शिंदे, सोपान गोपळघरे, केशव वणवे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शेंडे व शेषराव मस्के आदी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खर्डा शहरात एकूण ९ नवरात्र उत्सव मंडळे आहेत. यामधे ओंकारेश्वर नवरात्र उत्सव, ओंकारेश्वर प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ, जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ, जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळ, शिवछत्रपती नवरात्र मंडळ, नवजीवन नवरात्र उत्सव मंडळ, चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ, येडेश्वरी देवी नवरात्र उत्सव मंडळ, देवी नवरात्र उत्सव या मंडळांचा सामावेश आहेत. शहरातील या प्रत्येक मंडळांना भेटी देऊन आ. प्रा. राम शिंदेंनी आरती केली.

या विविध ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते महिला व अबालवृध्दांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here