जामखेड न्युज——
शेरखान पठाण यांची मुस्लिम विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
सामाजिक कार्यकर्ते शेरखान अकबर खान पठाण यांची मुस्लिम विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शेरखान पठाण यांना निवडीचे पत्र सत्तार ईनामदार संस्थापक तथा प्रदेश अधक्ष मुस्लीम विकास परिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या अडीअडचणी सुटण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे.
शेरखान पठाण यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, आपणास कळविण्यात येते की, आपली नियुक्ती मुस्लीम विकास परिषदच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी करण्यात येत आहे.
सदर पदाच्या अधिकाराचा वापर समाजाच्या हितासाठी व मुस्लीम विकास परिषदेच्या भरीव कामासाठी व संघटनेचे कार्य जनतेपर्यंत पोहचून समाजाचा विकास कराल अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.
शेरखान पठाण यांची नियुक्ती होताच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.