जामखेड न्युज——पलंगासाठी होणाऱ्या गर्दीतील गैरप्रकार टाळण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन कडून सूचना

नवरात्र उत्सवामध्ये सातव्या माळेला जामखेड शहरात पलंग येत असतो दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते या गर्दीचा फायदा काही चोर घेतात चोरांपासून संरक्षणासाठी जामखेड पोलीसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना जाहीर आव्हान केले आहे.

आज रोजी जामखेड शहरात तुळजापूर ला प्रस्थान करण्यासाठी पंलग/पालखी सोहळा आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर या पालखी सोबत गर्दीचा फायदा घेऊन चोर /गुन्हेगार घुसलेले असतात .हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे.तरी महिलांनी पालखी दर्शनासाठी येताना सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी. शक्यतो दागिने घालून पंलग दर्शन करिता येवू नये आपले मोबाईल ,दागिने ,पर्स इ.मौल्यवान वस्तू सांभाळण्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी.

पंलग जेथे दर्शन करिता खाली ठेवला जातो अशाच ठिकाणी दागिने चोरीला जाण्याची शक्यता असते तरी याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन आपल्या आजूबाजूला लक्ष देणें आवश्यक आहे. तरी पालखी मध्ये संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ जामखेड पोलीस स्टेशन ला कळवावे ही विनंती.
संपर्क क्रमांक पो स ई राजू थोरात 9422941550,
पो हे कॉ लोखंडे 9552518656, पो ना संग्राम जाधव 9834154445, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.