जामखेड न्युज——
कोणी कितीही गप्पा मारल्या तरी शिक्षक बँकेचा गुलाल यंदा गुरुकुल – स्वराज्य युतीचाच – विजयकुमार जाधव
यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

अहमदनगर जि. प्रा.शिक्षक बँकेच्या निवडणूकीला १५ दिवस शिल्लक असताना प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू असताना लोकप्रिय, ख्यातनाम साहित्यिक तथा शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्यासह संजय धामणे , रा.या.औटी, नितीन काकडे ,सुदर्शन शिंदे अशी मात्तबर शिक्षक नेत्यांची तगडी फौज सोबतीला घेवून गुरुकुल मंडळ विजयश्री खेचुन आणल्या शिवाय राहणार नाही तसेच शिक्षक बॅंक निवडणूकीत यंदा गुरुकूल- स्वराज्य युती २०० मतासह जामखेड तालुक्यात आघाडी घेणार असे सुतोवाच श्री विजयकुमार जाधव यांनी केले.
“रजनीकांत साखरे यांच्या रूपाने मंडळात नवचैतन्य निर्माण झाले आहे म्हणून गुरुकुल- स्वराज्य मंडळाचा विजय रथ कोणीही रोखू शकत नाही” असे विधान जिल्हा संपर्क प्रमुख श्री प्रतापराव पवार यांनी केले.
यावेळी जेष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, संजय घोडके, संभाजी तुपेरे, दत्तात्रय उदारे, जितेंद्र आढाव, कांतीलाल बरडे, अंकुश ओमासे, दत्ता भोसले, अनिल अष्टेकर, पोपट तुपसौंदर,फिरोज खान,अजित गोरड, लक्ष्मण वटाणे, शिरीष कदम, सचिन अंदुरे, दत्ता भोसले, बळीराम अवसरे , सुशील पौळ, शहाजी पांडूळे, नितीन शिंदे, विठठल जाधव,किशोर राठोड, स्वप्नील सवाई, जालींदर यादव, राजेंद्र साठे,योगेश तुपविहीरे आदी शिक्षक उपस्थित होते