आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त संध्या सोनवणे यांचा एक पाऊल तिच्या आरोग्यासाठी उपक्रमात हजारो महिलांची व मुलींची आरोग्य तपासणी

0
165
जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त संध्या सोनवणे यांचा एक पाऊल तिच्या आरोग्यासाठी उपक्रमात हजारो महिलांची व मुलींची आरोग्य तपासणी
स्त्रियांचे आरोग्य हा महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. विद्यार्थिनी तसेच महिलांमध्ये स्त्रीआरोग्य हा महत्वाचा विषय आहे; हे अधोरेखित करण्यासाठी व आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या संध्या सोनवणे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करत तालुक्यातील हजारो महिला व मुलींची आरोग्य तपासणी करत आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील महिला व मुलींना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. 
एक पाऊल तिच्या आरोग्यासाठी हा आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या संकल्पचा दुसरा आणि तिसरा टप्पा न्यू इंग्लिश स्कुल खर्डा आणि राजुरी विद्यालयात पार पडला.विद्यार्थिनींशी आरोग्य विषयक चर्चा करून तपासण्या केल्या.यावेळी कर्जत  जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, कल्याण सुरवसे, प्राचार्य सोमनाथ उगले, सरपंच नमिता गोपाळघरे, राजुरीचे सरपंच गणेश कोल्हे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, काकासाहेब कोल्हे, सागर कोल्हे, श्रीकांत फुंदे, अशोक कोल्हे, दत्ता कोल्हे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे,  ग्रा.प सदस्य महलिंग कोरे, चेअरमन चंद्रकांत गोलेकर, आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, तुलसीदास गोपाळघरे, महेश सोनवणे, गजानन उगले, शंकर खैरे, सुरज वाघुले, कुणाल व  सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी दि 30 रोजी खर्डा दि 01 रोजी राजुरी दि 3 रोजी खुरदैठण दि 4 रोजी तेलंगशी दि 5 रोजी शिरूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढल्याने मुलींनी भविष्यात अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते.आजाराचे प्रमाण वाढते.यासाठी विशेषतः नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ह्या तपासण्या केल्या यावरून मुलींना-महिलांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन देखील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे तरी शिबिराचा महिला व विद्यार्थिनीं लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संध्या सोनवणे यांनी केले आहे. 
स्त्रियांचे आरोग्य हा महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. विद्यार्थिनी तसेच महिलांमध्ये स्त्रीआरोग्य हा महत्वाचा विषय आहे; हे अधोरेखित करण्यासाठी व आ रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आयोजक संध्याताई सोनवणे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here