जामखेड न्युज——
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खुन करणा-या
आरोपीस जन्मठेप व वीस वर्षे कारावासाची शिक्षा
(बीड येथील जिल्हा न्यायाधीश मा. सत्यवान टी. डोके साहेब यांचा महत्वपूर्ण निकाल)
- दिनांक २१/१०/२०१५ रोजी पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक बाजीराव घाडगे यास बीड येथील मा. जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान टी. डोके साहेब यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व वीस वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास एवढया दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकिगत अशी की, दिनांक
२१/१०/२०१५ रोजी पिडीतेची आई कौटुंबीक कार्यक्रमा निमीत्त बाहेरगावी गेली होती व सायंकाळी परत आली असता पिडीत हि घरात दिसुन आली नाही त्यावरून फिर्यादीने विचारपुस केली असता पिडीता दुपारपासुन दिसली नाही.
असे निदर्शनास आले. फिर्यादीने नातेवाईकांस फोन करून विचारपुस केली व घराच्या आसपास तिचा शोध घेतला असता संध्याकाळी सात वाजणेचे सुमारास त्याच परिसरातील शेतातील बाजरीचे पिकात पिडीता हि मयत अवस्थेत मिळुन आली.
या सदर प्रकरणाची चौकशी केली असता असे समोर आले की पिडीता हि शाळेतुन आल्याचे नंतर आरोपीने घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन तिला त्याच परिसरातील शेतामध्ये बाजरीचे पिकात नेवुन तिचेवर बळजबरीने बलात्कार करून मुलीने सदरची घटना कोणस सांगु नये म्हणुन तिचे कपाळावर, तोंडावर दगडाने मारून तिस गंभीर जखमी करून खुन केलेला आहे.
त्यामुळे पिडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे आरोपी विरुध्द कलम ३०२,३७६ (२), (एफ) (आय) भादवी आणि कलम ३,४,५ (एन), ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरुन तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी.एन. पठाण यांनी या प्रकरणाचा तपास केला व मा. जिल्हा व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावनी मा. जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान.टी. डोके साहेब यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणात सरकार पक्षाने दाखल केलेला परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकिय पुरावा व कागदपत्रे यावरून व जिल्हा सरकारी वकिल अजय दि. राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. जिल्हा न्यायाधीश श्री सत्यवान डोके, साहेब यांनी आरोपी अशोक बाजीराव घाडगे यास कलम ३०२ भादवी कायदयान्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रूपये दंड तसेच कलम ४, ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये वीस वर्षाची सक्त मजुरी, व दोन हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे व आरोपीस सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाची आहे. सदर प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल अजय दि. राख यांनी काम पाहिले.